Breaking News

शिवणेकरांच्या पाणी लढ्याला यशाची चिन्हे; खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची प्रशासनाला कडक सूचना

शिवणेकरांच्या पाणी लढ्याला यशाची चिन्हे; खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची प्रशासनाला कडक सूचना


सांगोला प्रतिनिधी : नीरा उजवा कालवा फाटा क्रमांक ४ व ५ ला तातडीने पाणी सोडण्यात यावे,

 या मागणीसाठी शिवणे गावातील शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पंढरपूर येथे धाव घेतली. 

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट निश्चित करण्यात आली होती, मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.

 यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नात स्वतः लक्ष घालत ठाम भूमिका घेतली.

शिवणे गावचे लोकनियुक्त सरपंच मा. दादासाहेब घाडगे, शेतकरी नेते मा. बाळासाहेब वाळके, मा. प्रतापसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य मा. संभाजी घाडगे,

 सामाजिक कार्यकर्ते मा. निसार काझी तसेच इतर शेतकरी प्रतिनिधींनी पाणी प्रश्नाची सविस्तर माहिती खासदारांसमोर मांडली.

यावेळी खासदारांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सूचना देत सांगितले की,

“सांगोलकरांना आणि शिवणेकरांना पाणी मिळालेच पाहिजे. २६ तारखेला कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडण्यात यावे.”

तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत इशारा देत म्हटले की,

“मला २६ तारखेला शिवणे गावातून फोन आला पाहिजे की साहेब, पाणी आमच्या गावात आले आहे.”

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच शहाजी बापू पाटील यांच्या ठाम भूमिकेमुळे शिवणे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. पाणी प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने परिसरात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

शिष्टमंडळातील प्रमुख उपस्थित

मा. दादासाहेब घाडगे — लोकनियुक्त सरपंच

मा. बाळासाहेब वाळके — शेतकरी नेते

मा. प्रतापसिंह पाटील — शेतकरी नेते

मा. संभाजी घाडगे — ग्रामपंचायत सदस्य

मा. निसार काझी — सामाजिक कार्यकर्ते

तसेच इतर पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी

Post a Comment

0 Comments