फॅबटेक शिक्षण संस्थेत चोरी; अकाउंट ऑफिसमधून १ लाख ६० हजारांची रोकड लंपास
सांगोला : शहरातील फॅबटेक शिक्षण संस्थेच्या अकाउंट ऑफिसमध्ये अज्ञात चोरट्याने हात साफ करत तब्बल १ लाख ६० हजार ९०० रुपयांची
रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमरजित कृष्णात पुजारी (वय ३७, रा. चिंचोली रोड, नवीन वसाहत, सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या दरम्यान ही चोरी झाली.
अज्ञात चोरट्याने फॅबटेक शिक्षण संस्थेच्या अकाउंट ऑफिसमधील ड्रॉवरमधून ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांमधील
एकूण १ लाख ६० हजार ९०० रुपयांची रोकड चोरून नेली. घटना उघडकीस आल्यानंतर संस्थेकडून सांगोला पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाणे भाग ५ गु.र.नं. ४२३/२०२६ बीएनएस कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
असून पुढील तपास पोहेकॉ/१३७७ येडगे हे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची नोंद पोहेकॉ/१३६ शेख यांनी केली आहे.


0 Comments