Breaking News

प्रशासकांमुळे विकासकामे ठप्प; सरपंच व ग्रामसेवकांची कोंडी

प्रशासकांमुळे विकासकामे ठप्प; सरपंच व ग्रामसेवकांची कोंडी


सोलापूर : जिल्ह्यातील तब्बल 666 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आल्याने विकासकामांवर मोठा परिणाम झाला असून सरपंच आणि ग्रामसेवकांची कोंडी झाली आहे.

 निधी उपलब्ध असूनही खर्च करण्याचे अधिकार नसल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी ठप्प पडला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत विविध विकासकामांसाठी मार्च अखेरीस ग्रामपंचायतींना

 निधी वर्ग करण्यात आला. मात्र, ज्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त आहेत, 

त्या ठिकाणी सरपंच व ग्रामसेवकांना निधी खर्च करण्याचे अधिकार शासनाकडून देण्यात आलेले नाहीत. परिणामी, निधी उपलब्ध असूनही तो ठेकेदारांना देणे शक्य झालेले नाही.

यामुळे शाळा, अंगणवाडी, रस्ते आदी विकासकामे पूर्ण करूनही संबंधित ठेकेदारांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असून नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील 666 ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. मात्र, निधी खर्चाचे अधिकार स्पष्ट नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे.

 गटविकास अधिकाऱ्यांना निधी खर्च करण्याचे अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील विकासकामांना ब्रेक लागला असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments