Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. लाडकी बहीण योजनेला दिलासा! ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

ब्रेकिंग न्यूज.. लाडकी बहीण योजनेला दिलासा! ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ


राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी (e-KYC) दुरुस्तीसाठी मुदतवाढ जाहीर केली आहे.

आता पात्र महिलांना अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंतची नवीन अंतिम मुदत देण्यात आली आहे. 

यापूर्वी ही अंतिम तारीख ३१ मार्च होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती, त्यामुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला.

ही मुदतवाढ एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मंत्र्यांनी सांगितले की, हीच शेवटची संधी असून लाभार्थींनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा.

📌 ही योजना जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली असून, पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० थेट बँक खात्यात जमा केले जातात. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Post a Comment

0 Comments