शिवणे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ यशस्वी;
शेकडो नागरिकांच्या समस्या जागेवरच मार्गी तहसीलदार बाळुताई भागवत
सांगोला (प्रतिनिधी) : सामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विषयक अडचणी त्वरित सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान
शिबीर अभियान’ टप्पा १ अंतर्गत सांगोला तालुक्यातील शिवणे मंडळ येथे दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी उत्साहात शिबीर पार पडले. हे शिबीर मुक्ताई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला तहसीलदार बाळुताई भागवत, गट विकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, पंचायत समिती सदस्या स्मिता गोडसे,
जिल्हा परिषद सदस्यांचे प्रतिनिधी बाळासाहेब काटकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक दादासाहेब घाडगे तसेच शिवणे गावचे सरपंच आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित अनेक सेवा नागरिकांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या. अभियानांतर्गत एकूण ७२ फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली.
तसेच ७/१२ दुरुस्तीसाठी १ अर्ज स्वीकारण्यात आला. नागरिकांना १०२ डिजिटल ७/१२ उतारे, ३५ आठ ‘अ’ उतारे आणि ७५ विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
याशिवाय, कृषी विभागामार्फत मंजूर शेती अवजारे व ट्रॅक्टरसाठी ५ लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्रे देण्यात आली. ग्रामविकास विभागाकडून मंजूर घरकुल योजनांचे आदेशही लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.
या शिबिरामुळे नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण होऊन प्रशासनाविषयी विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
ग्रामीण भागात अशा प्रकारचे उपक्रम राबविल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून, शासनाच्या सेवा थेट त्यांच्या दारी पोहोचत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
.jpg)


0 Comments