वा.चिंचाळे येथे नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व
सौ. निकिताताई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते ग्रामस्थांसाठी सेवांचा नवा अध्याय सुरू
सांगोला (प्रतिनिधी) : वाणी-चिंचाळे परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सुविधा ठरणाऱ्या नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील तसेच सौ. निकिताताई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या नवीन पोस्ट ऑफिसमुळे परिसरातील नागरिकांना टपाल सेवा, बँकिंग सुविधा, शासकीय योजना तसेच विविध आर्थिक व्यवहारांची सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च दोन्ही वाचणार असून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास पोस्ट ऑफिसचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून गावाच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
गावाच्या दृष्टीने ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



0 Comments