मंथन परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक; श्लोक देशमुखचा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार
सांगोला : सांगोला तालुक्यातील कोळा विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी कु. श्लोक विनोद देशमुख याने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत
राज्य गुणवत्ता यादीत 150 पैकी 148 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल सांगोला तालुक्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ. देशमुख यांनी श्लोकच्या यशाचे कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड क्षमता असून कठोर परिश्रमाच्या जोरावर ते राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवू शकतात, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
याशिवाय, कोळा विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमधील इतर गुणवंत विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, शिक्षक, सहकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्लोक देशमुखच्या या यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


0 Comments