Breaking News

सांगोल्यातील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते पांडुरंग सावंत यांचे निधन

सांगोल्यातील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते पांडुरंग सावंत यांचे निधन


बातमी: सांगोला (प्रतिनिधी) – सांगोला शहरातील एसटी स्टँड परिसरात अनेक वर्षे वृत्तपत्र विक्री व्यवसाय करणारे 

तसेच सावंतवस्ती येथील रहिवासी पांडुरंग लक्ष्मण सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६१ वर्षे होते.

त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

त्यांच्या पश्चात आई, बहिणी, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्यावर सावंतवस्ती येथील शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार, दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सावंतवस्ती येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments