Breaking News

सांगोला शहरात “कमी व्होल्टेजचा कहर! महूद–चिंचोली रोडवरील नागरिकांचा संताप उसळला”

सांगोला शहरात “कमी व्होल्टेजचा कहर! महूद–चिंचोली रोडवरील नागरिकांचा संताप उसळला”


सांगोला / प्रतिनिधी महूद रोड व चिंचोली रोड परिसरात वीज वितरणातील भोंगळ कारभारामुळे नागरिक अक्षरशः 

त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात कमी दाबाच्या विजेची समस्या 

गंभीर बनली असून, घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

रहिवाशांच्या माहितीनुसार, विजेचा दाब अत्यंत कमी असल्याने फ्रीज, टीव्ही, पंखे, मोटार पंप यांसारखी उपकरणे नीट कार्यरत राहत नाहीत. 

काही ठिकाणी अचानक व्होल्टेजमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे अनेक उपकरणे जळून नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.

वारंवार तक्रारी करूनही संबंधित वीज वितरण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत 

नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या दुर्लक्षामुळे परिसरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

विशेषतः शेतकऱ्यांनाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. मोटार पंप नीट चालत 

नसल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले असून शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, खराब लाईन व ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करावेत,

 अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments