Breaking News

खर्डीत थरारक प्रकार! झोपेत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खूनाचा प्रयत्न

खर्डीत थरारक प्रकार! झोपेत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खूनाचा प्रयत्न


पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावात रविवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली.

 सद्गुरू सीताराम महाराज मंदिर परिसरात झोपलेल्या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोराने दगडाने जीवघेणा हल्ला केला.

या घटनेत महिबूब इब्राहिम आतार (रा. खर्डी) हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतार हे नेहमीप्रमाणे मंदिराजवळील

 ओट्यावर झोपले होते. याच दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने पाट्यासारखा मोठा दगड त्यांच्या डोक्यात घातला.

हल्ल्यानंतर आतार हे रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. 

काही वेळाने ही घटना लक्षात येताच परिसरातील भाविक व ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत त्यांना उपचारासाठी 

सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

दरम्यान, हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे आणि कोणी केला, याचा शोध पोलीस घेत असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

0 Comments