Breaking News

वादळाचा कहर! घरावरचे पत्रे कोसळून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शोकांतिका

वादळाचा कहर! घरावरचे पत्रे कोसळून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शोकांतिका


सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर शहर व जिल्ह्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. 

या वादळाचा फटका उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा गावाला बसला असून, घरावरील पत्रे उडून झालेल्या अपघातात १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

फरहान असलम कल्याणी (वय १२) असे मृत मुलाचे नाव असून, ही हृदयद्रावक घटना अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सायंकाळी साडेचार ते पावणे पाचच्या सुमारास घडली. 

फरहान घरामध्ये बसलेला असताना वादळामुळे घरावरील पत्र्याचे शेड व लोखंडी अँगल अचानक कोसळले. हे साहित्य थेट त्याच्या डोक्यावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, 

संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. सणाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. 

नागरिकांनी वादळी हवामानात सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments