google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाटंबरेच्या श्वेता पवारची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड; प्रा. पी. सी. झपके यांच्या हस्ते सत्कार

Breaking News

वाटंबरेच्या श्वेता पवारची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड; प्रा. पी. सी. झपके यांच्या हस्ते सत्कार

वाटंबरेच्या श्वेता पवारची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड; प्रा. पी. सी. झपके यांच्या हस्ते सत्कार


सांगोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या निकालात सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील श्वेता सखाराम पवार हिची खेळाडू कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली आहे. 

या उल्लेखनीय यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. पी. सी. झपके यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

श्वेता पवारचे प्राथमिक शिक्षण वाटंबरे येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे पूर्ण झाले. या काळात क्रीडा शिक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ८ वी ते १० वी दरम्यान तिने विविध स्तरांवरील बॉक्सिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.

यानंतर तिने बारावीपर्यंतचे शिक्षण जय हिंद कॉमर्स कॉलेज, पिंपरी येथे, तर पदवी शिक्षण बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC), पुणे येथे पूर्ण केले. सन २०१९ मध्ये झालेल्या ७२ व्या विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय स्पर्धेत बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात तिने कांस्यपदक मिळविले.

एमपीएससीच्या २०२५ च्या परीक्षेत तिने महसूल सहाय्यक पद मिळवत पुणे शहरातील उपनिबंधक कार्यालयात सध्या कार्यरत आहे. पुढे एमपीएससीच्या माध्यमातून खेळाडूंच्या कोट्यातून तिने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

“माझ्या मुलीने मोठे कष्ट घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले. तिच्या यशाचा आम्हाला मनस्वी आनंद आणि अभिमान आहे,” अशी भावना तिचे वडील सखाराम पवार यांनी व्यक्त केली.

खेळाडूंनाही उत्तम नोकरीच्या संधी

गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांबरोबरच खेळाडूंनाही राखीव जागांमुळे चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी ध्येयाशी एकनिष्ठ राहून सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न पालकांना समजावून सांगावेत

 आणि पालकांनीही मुलांना योग्य संधी द्यावी. सांगोला विद्यामंदिर प्रशालेत राबविले जाणारे विविध उपक्रम आणि क्रीडा स्पर्धांमुळे मला क्रीडा कौशल्य विकसित करता आले, असे नूतन पोलीस उपनिरीक्षक श्वेता पवार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments