Breaking News

बारामतीत सत्तेला थेट आव्हान! न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा पहिला अर्ज; राजकीय समीकरणे ढवळून निघणार? घुटुगडे बंधू

बारामतीत सत्तेला थेट आव्हान! न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा पहिला अर्ज; राजकीय समीकरणे ढवळून निघणार? घुटुगडे बंधू 


बारामती : राज्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात आता नव्या राजकीय वादळाची चाहूल लागली आहे. 

न्यू राष्ट्रीय समाज पार्टी तर्फे प्रा. आर. वाय. घुटूकडे साहेब यांनी सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान माढा लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार म्हणून चर्चेत असलेले इंजि. रामचंद्र घुटूकडे साहेब

 यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. त्यांच्या उपस्थितीमुळे या लढतीला अधिकच राजकीय धार प्राप्त झाली आहे.

बारामतीत आतापर्यंत एकहाती असलेले राजकीय वर्चस्व आता आव्हानात सापडणार का? 

घुटूकडे यांच्या या धडाकेबाज एन्ट्रीमुळे पारंपरिक समीकरणे ढासळण्याची चिन्हे दिसत आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, “बारामतीत यावेळी खरी लढत होणार” असा सूर उमटू लागला आहे. 

आता येणाऱ्या दिवसांत इतर पक्षांचे उमेदवार आणि प्रचाराची रणधुमाळी कशी रंगते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments