सांगोल्यात दुय्यम निबंधक कार्यालयातील मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त
सांगोला : सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून सध्या कार्यालयात सावळा
गोंधळ माजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येथील काही अधिकाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने कामकाज केले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.
मालमत्ता खरेदी-विक्री, दस्त नोंदणी तसेच इतर शासकीय नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार आहे. अनेकदा किरकोळ कारणे सांगून कामे प्रलंबित ठेवली जात
असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. काही वेळा आवश्यक कागदपत्रे पूर्ण असतानाही विविध कारणे पुढे करून कामात अडथळे निर्माण केले जात असल्याची चर्चा सुरू आहे.
या परिस्थितीमुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी, व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे. कार्यालयातील कामकाज अधिक पारदर्शक व सुरळीत व्हावे
आणि नागरिकांना विनाकारण त्रास होऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


0 Comments