सांगोला पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारी गाडी पकडली
सांगोला : सांगोला तालुक्यातील वाढेगाव परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर सांगोला पोलिसांनी कारवाई करत
वाहनासह वाळू जप्त केली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.३५ वाजण्याच्या सुमारास वाढेगाव ते जुना सावे या रस्त्यावर हजारे वस्तीसमोर अवैध वाळू वाहतूक होत
असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक बिस्कीट रंगाची अशोक लेलँड कंपनीची ‘दोस्त’ चारचाकी गाडी अडविण्यात आली.
तपासणीदरम्यान संबंधित वाहनाला आरटीओ क्रमांक नसल्याचे आढळून आले. तसेच गाडीच्या मागील हौद्यात अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली.
जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत सुमारे ३ लाख ७ हजार रुपये, तर वाळूची किंमत सुमारे ७ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी दिपक मोहन जावीर (वय ३१, रा. वाढेगाव, ता. सांगोला) याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५ (ई) व ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम रसूल नदाफ यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.


0 Comments