google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाची महत्त्वपूर्ण विचार–विनिमय बैठक रविवारी दि. ८ मार्च रोजी दुपारी १ वाजता भाई गणपतराव देशमुख सहकारी सुतगिरणी, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

Breaking News

सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाची महत्त्वपूर्ण विचार–विनिमय बैठक रविवारी दि. ८ मार्च रोजी दुपारी १ वाजता भाई गणपतराव देशमुख सहकारी सुतगिरणी, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाची महत्त्वपूर्ण विचार–विनिमय बैठक रविवारी


दि. ८ मार्च रोजी दुपारी १ वाजता भाई गणपतराव देशमुख सहकारी सुतगिरणी, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख 

सांगोला (प्रतिनिधी) – सांगोला तालुक्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यांची महत्त्वपूर्ण विचार–विनिमय बैठक रविवारी आयोजित करण्यात आली आहे. 

ही बैठक दि. ८ मार्च रोजी दुपारी १ वाजता भाई गणपतराव देशमुख सहकारी सुतगिरणी, सांगोला येथे पार पडणार आहे.

या बैठकीत तालुक्यातील संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय रणनीती, स्थानिक प्रश्न तसेच कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन

 पुढील दिशा ठरविण्याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

तालुक्यातील शेकापचे सर्व कार्यकर्ते, तसेच आजी-माजी पदाधिकारी यांनी या बैठकीला वेळेत उपस्थित

 राहून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी आपले विचार मांडावेत, असे आवाहनही आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

सांगोला तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करून पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या बैठकीकडे सांगोला तालुक्यातील शेकाप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments