Breaking News

सांगोला मार्गावर वाढेगावः राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू

सांगोला मार्गावर वाढेगावः राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वर मंगळवेढा-सांगोला मार्गावर वाढेगाव (ता. सांगोला) येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील २ जणांचा मृत्यू झाला 

असून चौघे जखमी झाले आहेत. हा अपघात २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.०० वाजता वाढेगाव येथील हॉटेल ज्योतिर्लिंग समोर घडला.

याबाबत युवराज एकनाथ चक्रे (वय ५२, व्यवसाय गवंडी काम, रा. राजेंद्रनगर, मोरेवाडी रोड, करवीर, जि. कोल्हापूर) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, ट्रकच्या वाहनचालकाने महामार्गाच्या लेनवर कोणताही इंडिकेटर न

लावता उभा केला होता. त्याच वेळी रोहीत युवराज चक्रे (वय २८) हे कार चालवत होते. उभ्या ट्रकला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली.

या भीषण धडकेत रोहीत युवराज चक्रे (वय २८) आणि त्यांची बहीण पुनम बबन सोरटे (वय ३९) यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. 

अपघातात फिर्यादी युवराज चक्रे यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून संगीता चक्रे याही जखमी झाल्या त्यांचा एक डोळा निकामी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशनचे पोहेका बनसोडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments