google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तहसील कार्यालयातील मंडल अधिकाऱ्यावर लाचखोरीचा सापळा; चालकासह रंगेहात अटक

Breaking News

सांगोला तहसील कार्यालयातील मंडल अधिकाऱ्यावर लाचखोरीचा सापळा; चालकासह रंगेहात अटक

सांगोला तहसील कार्यालयातील मंडल अधिकाऱ्यावर लाचखोरीचा सापळा; चालकासह रंगेहात अटक 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) सोलापूर युनिटने सांगोला तालुक्यात मोठी कारवाई करत संगेवाडी मंडल कार्यालयातील मंडल

 अधिकारी व त्यांच्या चालकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणामुळे सांगोला तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 210/2026 नोंद करण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7-A व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार विनोद सिताराम सातपुते यांनी त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या दस्ताऐवजी हरकतीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी

 मंडल अधिकारी श्रीमती विजया महारूद्र नाईक यांनी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ACB कडे केली होती. तडजोडीनंतर 7 हजार रुपयांवर व्यवहार ठरविण्यात आला.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB पथकाने 5 मार्च रोजी दुपारी 1.41 ते सायंकाळी 5.02 दरम्यान संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालय येथे सापळा रचला. 

यावेळी मंडल अधिकारी नाईक यांच्या वतीने त्यांचा खाजगी वाहन चालक वैभव पिराजी मोरे याने तक्रारदाराकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले.

कारवाईदरम्यान लाचेची रक्कम, आरोपींचे मोबाईल, आरोपीच्या अंगावरील शर्ट तसेच सापळा कारवाईचे मेमरी कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास ACB सोलापूरचे पोलीस निरीक्षक शैलेश पवार करत आहेत. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments