Breaking News

सांगोला तालुक्यात मोटारसायकल रेसच्या वादातून तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध कारवाईची मागणी

 सांगोला तालुक्यात मोटारसायकल रेसच्या वादातून तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध कारवाईची मागणी


सांगोला/आटपाडी : प्रतिनिधी मोटारसायकलच्या रेसवरून झालेला किरकोळ वाद मिटवण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात

 आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करगणी येथील विशाल धनाजी मंडले यांच्यावर कोळा येथील माकुबाई

 मंदिरासमोरील चौकात हा हल्ला झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अवधूत सुभाष केंगार, यशवंत नवनाथ मोहिते, आदिनाथ नवनाथ मोहिते आणि शंभू गोविंद हातेकर यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.

फिर्यादी विशाल मंडले यांनी दिलेल्या जबाबानुसार, ७ सप्टेंबर रोजी शुक्राचार्य देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटारसायकल रेस करण्याच्या

 कारणावरून त्यांच्या भावकीतील शेखर मंडले आणि काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला होता.

 हा वाद मिटवण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी अवधूत केंगार यांच्या फोननंतर विशाल मंडले हे त्यांचे चुलत भाऊ शरद मंडले यांच्यासोबत कोळा येथे गेले होते.

माकुबाई मंदिरासमोरील चौकात संबंधित व्यक्तींशी चर्चा सुरू असताना वाद वाढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 'किरकोळ भांडणे आहेत, मिटवूया' असे सांगत असताना शिवीगाळ करण्यात आली. 

त्यानंतर यशवंत मोहिते यांनी पॅन्टच्या खिशातून चाकू काढला आणि अवधूत केंगार यांच्या मदतीने आपल्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप विशाल मंडले यांनी केला आहे.

चाकू पोटाजवळील बरगडीच्या भागात खोलवर घुसल्याने गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आदिनाथ मोहिते आणि शंभू हातेकर यांनी काठीने 

मारहाण केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

 या घटनेत विशाल मंडले यांचे चुलत भाऊ शरद मंडले यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील स्वप्निल बोडरे, राजेश मंडले, अक्षय मंडले आणि कन्हैया कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विशाल मंडले यांना मोटारसायकलवरून 

आटपाडी येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथील क्रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोटारसायकल रेसच्या किरकोळ वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments