मंत्रालयात दमदार एन्ट्री! नूतन सदस्य अतुल पवार यांचा मान्यवरांकडून भव्य सत्कार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
मुंबई : जवळा जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य मा. अतुल पवार यांनी मंत्रालय, मुंबई येथे कामानिमित्त भेट दिली
असता त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामुळे मंत्रालय परिसरात पवार यांच्या कार्याची जोरदार चर्चा रंगली.
राजर्षी शाहू नागरी सेवा संस्था, महाराष्ट्र राज्याचे चेअरमन आयु. जनार्दनजी चांदणे साहेब, आयु. अभिमन्यू कांबळे साहेब
तसेच उद्योजक मा. भिमराम शेलार साहेब यांच्या हस्ते अतुल पवार यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
नुकत्याच झालेल्या निवडीनंतर पवार यांची ही मंत्रालयातील दमदार उपस्थिती आणि झालेला सत्कार हा त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाचे प्रतीक मानला जात आहे.
यावेळी मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे काम करण्याचे आवाहन केले.
सामाजिक व विकासकामांमध्ये सक्रिय असलेले अतुल पवार यांच्याकडून भविष्यात मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असून,
या सत्कारामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीला नवे बळ मिळाल्याची चर्चा सुरू आहे.


0 Comments