google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ५५ वर्षांनंतर सांगोला पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा; गुढीपाडव्याला नूतन सभापती-उपसभापतींचा पदग्रहण सोहळा

Breaking News

५५ वर्षांनंतर सांगोला पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा; गुढीपाडव्याला नूतन सभापती-उपसभापतींचा पदग्रहण सोहळा

५५ वर्षांनंतर सांगोला पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा; गुढीपाडव्याला नूतन सभापती-उपसभापतींचा पदग्रहण सोहळा आबा बापू यांच्या उपस्थितीत होणार 


सांगोला : तालुका प्रतिनिधी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला पंचायत समितीवर अखेर महायुतीने सत्ता मिळवत आपला झेंडा फडकवला आहे. तब्बल ५५ वर्षे शेतकरी कामगार पक्षाची असलेली एकहाती सत्ता यंदा संपुष्टात आली

 असून, भाजपच्या नूतन सभापती पूनम इंगवले आणि शिवसेनेचे उपसभापती अजय सरगर हे मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दि. १९ मार्च रोजी दुपारी १ वाजता गुढीपाडव्याच्या दिवशी पदभार स्वीकारणार आहेत.

सांगोला पंचायत समितीवर सलग ५५ वर्षे शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. मात्र यंदा सांगोल्याच्या राजकारणातील “जय-वीरू” म्हणून ओळखले जाणारे 

माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी एकत्र येत शेकापला मोठा धक्का दिला

 आणि पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकवला. सभापती आणि उपसभापती अशी दोन्ही महत्त्वाची पदे महायुतीकडे आल्याने सांगोला तालुक्यातील त्यांच्या समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

गुरुवारी होणाऱ्या या पदग्रहण सोहळ्याला माजी आमदार शहाजीबापू पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील,

 भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजप नेते बाळासाहेब एरंडे, भाऊसाहेब रुपनर, आरपीआयचे खंडू सातपुते यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व नेते उपस्थित राहणार आहेत.

या पदग्रहण सोहळ्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, सांगोला पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी-पराभूत उमेदवार, ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच व उपसरपंच,

 तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन शिवसेना तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, मधुकर बनसोडे तसेच भाजप तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर आणि दादा खरात यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments