महायुतीचा विकासाचा अजेंडा, पाणी-वीज-रस्त्यांसह मूलभूत प्रश्नांवर थेट संवाद
बलवडी गावात चेतनसिंह केदार सावंत – अजय सरगर यांच्या गावभेट दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद
सांगोला (प्रतिनिधी): चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत व चोपडी पंचायत समिती गणाचे उमेदवार अजय सरगर यांनी बलवडी गावात गावभेट दौरा करत विकासाचा आक्रमक
अजेंडा थेट जनतेसमोर मांडला. या दौऱ्यात त्यांनी घराघरात जाऊन नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण व शेतीसंबंधी मूलभूत प्रश्नांची माहिती जाणून घेतली.
या दौऱ्यात त्यांनी गावातील प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या समस्या, अडचणी, अपेक्षा जाणून घेतल्या.
“निवडणूक म्हणजे केवळ मत मागणे नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांची जबाबदारी स्वीकारणे” हा संदेश या दौऱ्यातून दिला.
ग्रामस्थांशी संवाद साधताना चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाणी, रस्ते व विजेचा प्रश्न सोडवला जाईल.
केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असून शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची क्षमता महायुतीकडेच आहे.
केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असून शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची ताकद महायुतीकडेच आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीत आपले प्रतिनिधी असतील, तर बलवडीसह संपूर्ण चोपडी गटाचा सर्वांगीण विकास निश्चित आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीत महायुतीची सत्ता आल्यास बलवडी गावाचा सर्वांगीण विकास निश्चित आहे, असा ठाम विश्वास चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला.
या दौऱ्यात नगरसेविका सुजाताताई केदार सावंत यांनी महिलांशी स्वतंत्र संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बचतगट, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पाणी, घरकुल योजना,
स्वच्छता व मुलींच्या शिक्षणासंदर्भातील प्रश्नांवर त्यांनी महिलांना विश्वास दिला. “महिलांचा सहभाग वाढला तरच गावाचा खरा विकास शक्य आहे,” असे त्या म्हणाल्या.
या गावभेट दौऱ्याला युवक, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विकासासाठी महायुतीला मतदान करून चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार
चेतनसिंह केदार सावंत व चोपडी पंचायत समिती गणाचे उमेदवार अजय सरगर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बलवडी गावात महायुतीच्या विजयाचा आत्मविश्वास या दौऱ्यातून ठळकपणे दिसून आला.



0 Comments