कडलास जिल्हा परिषद गटातील वझरे गावात महायुतीच्या उमेदवार
शोभाताई खटकाळे व अजनाळे गणाचे उमेदवार शितल भडंगे यांच्या होम टू होम प्रचारास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगोला/ प्रतिनिधी: कडलास जिल्हा परिषद गटाच्या महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार शोभाताई बाबासाहेब खटकाळे व अजनाळे गणाच्या भाजपच्या उमेदवार
शितल सचिन भडंगे यांच्या प्रचारार्थ वझरे येथे घरोघरी जाऊन मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे उमेदवाराकडून आश्वासन देण्यात आले.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विकास कामावर जनतेचा पूर्णपणे विश्वास असून यांच्याकडून भविष्यात वझरे गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.
शहाजीबापूंचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना समर्थ साथ देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना वझरे गावातून मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन महायुतीच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आले.
मतदारांनी दिलेल्या मतदानाची परतफेड म्हणून उमेदवार विकास कामाच्या माध्यमातून उपकाराची परतफेड करतील असा शब्द उद्योगपती बाळासाहेब आसबे यांनी दिला आहे.
यावेळी प्रचारासाठी कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे , अजनाळे गणाच्या उमेदवार शितल भडंगे, वझरे गावच्या सरपंच बानू चव्हाण, अंजना देशमुख, तारका खटकाळे, रेश्मा खटकाळे, सविता शिंदे, संगीता केदार, उमा मस्के, सुमित्रा भडंगे,
अवम पाटील, मंदाबाई चव्हाण, राजाबाई मंडले, काजल मंडले, नमिता जावीर , अमृता पाटील या महिला कार्यकर्त्यानी होम टू होम प्रचार करीत मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याविषयी आवाहन केले .
उमेदवार , पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नाझरे येथील श्रीदत्त मंदिर ,श्री. संजीवा स्वामी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी उद्योगपती बाळासाहेब आसबे, अमीन मुंडे, गोरख शिंदे, परमेश्वर धुरे,
विजय कोटे, दत्ता पाटील, राजू पाटील, वसंत पाटील, सागर सरगर ,मार्तंड चव्हाण, राहुल चव्हाण, मल्हारी चव्हाण, बलभीम चव्हाण, लक्ष्मण वाघमारे, हणमंत भोसले, स्वप्निल रेड्डी, गोटू चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

.jpg)
.jpg)
.jpg)

0 Comments