Breaking News

“जवळा गटात विरोधकांची लक्तरे उतरली; शहाजीबापू पाटलांच्या वज्राघाताने राजकीय ढोंगाचा पर्दाफाश!”

“जवळा गटात विरोधकांची लक्तरे उतरली; शहाजीबापू पाटलांच्या वज्राघाताने राजकीय ढोंगाचा पर्दाफाश!” 


जिल्हा परिषद जवळा गटात मा. अतुल (मालक) पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केवळ गर्दी नव्हे, 

तर विरोधकांविरोधात जनतेचा उद्रेकच पाहायला मिळाला. सभास्थळी उसळलेला जनसागर आणि प्रत्येक घोषणेतून उमटणारा संताप हा गेल्या अनेक वर्षांच्या फसवणुकीचा हिशोब होता.

या सभेत मा. आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या भाषणाने विरोधकांचा तथाकथित विकासाचा फुगा अक्षरशः फोडून काढला.

ते ठाम शब्दांत म्हणाले,

“ज्यांनी पाच वर्षे तोंड उघडले नाही, ते आज अचानक जागे झालेत. विकास झोपेत असताना हे लोक गाढ झोपले होते; निवडणूक आली आणि ढोंग सुरू झालं!”

विरोधकांच्या कथित कामांवर बोचरी टीका करत ते म्हणाले,

“कागदावरचे रस्ते, फोटोपुरते उद्घाटन आणि फक्त स्वतःचे उखळ पांढरे करण्याचे उद्योग—हाच त्यांचा विकास! जनतेने विचारायचंय, पाणी कुठे गेलं? रस्ते कुठे गेले? रोजगार कुठे गेला?”

शहाजीबापू पाटील यांनी पुढे सांगितले,

“जवळा गटाला आतापर्यंत नेते नव्हते, दलाल होते. सत्तेचा उपयोग स्वतःसाठी केला, आणि जनतेला केवळ तारीख दिली.”

हा उपरोध ऐकताच सभास्थळी एकच जल्लोष उसळला.

त्यांनी अतुल पवार यांचे कौतुक करत स्पष्ट शब्दांत सांगितले,

“अतुल पवार हे बोलघेवडे नाहीत. ते बोलण्याआधी काम करतात. म्हणूनच आज विरोधक घाबरलेत, कारण जनता खोटं आणि खरं ओळखायला लागली आहे.”

सभेदरम्यान ‘घड्याळाला मत म्हणजे दलालीला चाप’, ‘काम करणाऱ्यालाच संधी’ अशा घोषणांनी विरोधकांची चांगलीच गोची झाली.

महिला, तरुण, शेतकरी यांचा प्रचंड सहभाग पाहता, या निवडणुकीत विरोधकांचा पराभव ठरलेलाच आहे, अशी चर्चा उघडपणे रंगू लागली आहे.

ही सभा म्हणजे केवळ प्रचार नव्हता, तर वर्षानुवर्षांच्या राजकीय फसवणुकीवर जनतेने ठोकलेली अंतिम मोहोर होती.

जवळा गटात आता विकासाच्या नावावर ढोंग चालणार नाही, हे या सभेने स्पष्ट करून दाखवले आहे.

Post a Comment

0 Comments