(शिंदे गट)शिवसेनेच्या सांगोला तालुका मागासवर्गीय सेलची धुरा मा.आप्पासाहेब वाघमारे यांच्या हाती भव्य सत्कार सोहळ्यात संघटन वाढीचा निर्धार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणाला मोठी चालना देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, शिवसेनेच्या मागासवर्गीय सेलच्या तालुकाध्यक्षपदी आप्पासाहेब रामचंद्र वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेनेचे युवा नेते मा. दिग्विजय दादा पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना दिग्विजय दादा पाटील यांनी आप्पासाहेब वाघमारे यांचे अभिनंदन करताना सांगितले की, मागासवर्गीय समाजाला न्याय, हक्क आणि प्रतिनिधित्व देण्याचे काम शिवसेनेने नेहमीच केले आहे.
सांगोला तालुक्यात मागासवर्गीय सेल अधिक मजबूत करून शिवसेनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी आता आप्पासाहेब वाघमारे यांच्यावर असून, ते ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढील काळात राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे कार्य घराघरात पोहोचवावे,
प्रत्येक गावात संघटन मजबूत करावे व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढावे, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना आप्पासाहेब वाघमारे यांनी सांगोला तालुक्यातील मागासवर्गीय समाजाला शिवसेनेशी अधिक घट्ट जोडण्यासाठी प्रामाणिकपणे,
ताकदीने आणि निष्ठेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेनेचे विचार, ध्येयधोरणे आणि नेतृत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.
या प्रसंगी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा युवा सेनेचे संपर्कप्रमुख सागर दादा पाटील, चिक महूद गावचे सरपंच सुरेश भाऊ कदम, चेअरमन संजय काका पाटील, उपसरपंच दादासाहेब बंडगर, माजी चेअरमन कालिदास भोसले, मच्छिंद्र यादव, अंकुश वाघमारे,
नाना यादव, दीपक यादव, लखन वाघमारे, माजी सरपंच महादेवजी गोडसे, नेम मेंबर कुंडलाआबा जाधव, माजी चेअरमन विश्वनाथ फरतडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीमुळे सांगोला तालुक्यात शिवसेनेच्या मागासवर्गीय सेलला नवे बळ मिळाले असून, येत्या काळात संघटन अधिक आक्रमक पद्धतीने कामाला लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.



0 Comments