साळुंखे पाटलांच्या बालेकिल्ल्याला भगदाड!
जवळा गटात राष्ट्रवादीचे अतुल पवार विजयी; यशराजे साळुंखे पराभूत
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जवळा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अत्यंत धक्कादायक निकाल समोर आला आहे.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचे सुपुत्र यशराजे साळुंखे पाटील यांचा पराभव झाला असून,
राष्ट्रवादीचे अतुल पवार यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. साळुंखे पाटील कुटुंबाचा हा परंपरागत बालेकिल्ला उध्वस्त
झाल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शहाजीबापूंच 'बळ' आणि साळुंखेंना 'धक्का'
या निवडणुकीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी किंगमेकरची भूमिका बजावल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे उमेदवार जगदीश पाटील यांना थांबण्याचा आग्रह
धरून, बापूंच्या गटाने आपली सर्व ताकद राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल पवार यांच्या पाठीशी उभी केली.
विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे यांनी घेतलेल्या भूमिकेचा बदला
किंवा त्यावेळचा राग या निकालातून स्पष्टपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
*महत्त्वाची वैशिष्ट्ये:*
परंपरागत वर्चस्वाला धक्का: साळुंखे पाटील कुटुंबाचे वर्चस्व असलेला जवळा गट यंदा त्यांच्या हातातून निसटला आहे.
रणनीती यशस्वी: शहाजीबापू पाटील यांनी दिलेली साथ अतुल पवार यांच्या विजयासाठी निर्णायक ठरली.
कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
या निकालामुळे 'आबांची वाट चुकत तर नाही ना?' असा प्रश्न आता कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.
"हा विजय जवळा गटातील जनतेचा आणि संघर्षाचा आहे. विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी आम्हाला साथ दिली आहे."
अतुल पवार (विजयी उमेदवार)
आबा प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण
दीपकआबा साळुंखे पाटील यांनी आजवर तालुक्याच्या राजकारणात आपले स्थान टिकवून ठेवले होते, मात्र घरच्याच मतदारसंघात मुलाचा झालेला पराभव
हा त्यांच्यासाठी मोठा सेटबॅक मानला जात आहे. "आबांच्या काही राजकीय निर्णयांचा फटका बसत आहे का?" अशी धास्ती त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे.


0 Comments