सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकालात महिलांनीच मारली बाजी
निकाल जाहीर प्रमाणपत्र देऊन हार्दिक अभिनंदन निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ची मतमोजणी आज दिनांक 09/02/2026 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात सकाळी 10:00 वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती मतमोजणीसाठी सुमारे 140 स्टाफ उपस्थित होता
तसेच कडक सुरक्षा पोलीस बंदोबस्तासाठी 150 पोलीस स्टाफ उपस्थित पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला होता, चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी व सहाय्यक
निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी मतमोजणीचे नियोजन उत्तम प्रकारे केलेले होते या कामी निवडणूक नायब तहसीलदार सुनील बेलभंडारे, निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे
,सर्व मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, झोनल ऑफिसर, संगणक टीम, नोडल अधिकारी, मॅन्युअल टॅबिलेशन टीम, टपाली मतदान टीम, सर्व मीडिया पत्रकार बंधू भगिनी, मीडिया सेल चे कमलेश सातपुते,
बाबासो पाटील उपस्थित असल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी सांगितले आहे या निवडणुकीत कमी कालावधीत सर्वांनीच उत्तमरीत्या निवडणुकीचे काम पूर्ण केले आहे
विशेष करून मीडिया सेल पत्रकार बांधवांनी व निवडणूक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी उत्तम काम व सहकार्य केले त्याबद्दल निवडणूक निर्णय
अधिकारी बी आर माळी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत आज जाहीर झालेल्या निकालातून खालील उमेदवार जि प व पंचायत समिती गटातू उमेदवार विजयी झाले आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
दादासो भगवान लवटे
शिवसेना- महुद गट ,
पाटील सोनाली उमेश शिवसेना- महूद गण ,
बंडगर बाळासाहेब मच्छिंद्र शिवसेना- चिकमहुद गण, अलदर सिंधुताई मोहन- सांगोला तालुका विकास आघाडी- एखतपूर गट , गोडसे स्मिता दीपक- सांगोला तालुका विकास आघाडी -वाकी शिवणे गण ,
नवले सुवर्णा संजय तालुका सांगोला तालुका विकास आघाडी- एखतपूर, पवार अतुल प्रभाकर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- जवळा गट, शेळके वंदना भारत सांगोला तालुका विकास आघाडी- वाढेगाव गण,
इंगवले पुनम सुदर्शन सांगोला तालुका विकास आघाडी -जवळागण, खटकाळे शोभा बाबासो शिवसेना- कडलास गट, पाटील राणी सुरज शिवसेना- कडलास गण, जावीर बापू अशोक
सांगोला तालुका विकास आघाडी -अजनाळे गण, केदारसावंत चेतनसिंह तात्यासाहेब भारतीय जनता पार्टी -चोपडी गट, दबडे सदाशिव मारुती भारतीय जनता पार्टी -राजुरी गण, सरगर अजय उत्तम शिवसेना -चोपडी गण, पांढरे केराप्पा महादेव सांगोला तालुका विकास आघाडी -कोळा गट,
कोळेकर छाया सोपान सांगोला तालुका विकास आघाडी- कोळागण, पाटील अमृत नारायण सांगोला तालुका विकास आघाडी -हतीद गण ,मोटे संगीता सोमा सांगोला तालुका विकास आघाडी- घेरडी गट,
काशीद काजल मुकेश सांगोला तालुका विकास आघाडी -सोनंद गण ,चोरमुले अशोक नामदेव अपक्ष- घेरडीगण ,वरील सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद वर निवडून आलेल्या सन्माननीय सदस्यांचे माननीय निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर. माळी
व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी स्वागत करून प्रमाणपत्र देऊन हार्दिक अभिनंदन केलेले आहे व वरील सर्व उमेदवार निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी यांनी जाहीर केले आहे




0 Comments