सांगोला पंचायत समिती आघाडीच्या ९ तर महायुतीच्या ५ जागांवर विजय
जिल्हा परिषद महायुतीच्या ४ तर आघाडीच्या ३ जागांवर विजय पहा मिळालेली मते..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)
सांगोला (प्रतिनिधी): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यात महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय) आणि शेकाप–दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या
सांगोला तालुका विकास आघाडी यांच्यात अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची लढत पाहायला मिळाली. निकालांमधून सांगोल्याचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलून गेले असून, सत्तासंतुलन स्पष्टपणे दिसून आले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण सात गटांपैकी महायुतीने महूद, जवळा, कडलास आणि चोपडी या चार गटांवर विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली.
तर एखतपूर, कोळा, घेरडी या तीन गटात आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. दरम्यान, पंचायत समिती निवडणुकीत मात्र आघाडीने सरशी मिळवली आहे. एखतपूर,
वाकी शिवणे, जवळा, वाढेगाव, अजनाळे, कोळा, हातिद, घेरडी आणि सोनंद या नऊ गणांमध्ये आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. महायुतीला महूद, चिकमहूद, कडलास, चोपडी आणि राजुरी या पाच जागांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांनी माजी आमदार दीपकआबा साळुंखे यांचे
चिरंजीव सूर्यादित्य उर्फ यशराजे साळुंखे पाटील यांचा त्यांच्या हक्काच्या जवळा मतदारसंघात तब्बल १५५४ मतांनी पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
चोपडी जिल्हा परिषद गटात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी आघाडीचे उमेदवार विजयकुमार शिंदे यांचा दारुण पराभव केला. महूद गटात शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे यांनी आघाडीचे बाळासाहेब ढाळे यांचा पराभव केला.
कडलास गटात युवा नेते योगेशदादा खटकाळे यांच्या मातोश्री शोभाताई खटकाळे यांनी आघाडीच्या उमेदवार संगीता शिंदे (नंदकुमार शिंदे यांच्या पत्नी) यांचा विक्रमी मतांनी पराभव करत मोठा धक्का दिला.
मात्र कोळा जिल्हा परिषद गटात भाजपचे उमेदवार व पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी आलदर यांना पराभव स्वीकारावा लागला असून, येथे आघाडीचे उमेदवार किरण पांढरे विजयी झाले आहेत.
सांगोला तालुक्यातील हे निकाल केवळ विजय–पराभवापुरते मर्यादित न राहता, येत्या काळातील स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारे ठरले असून आता पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे…
महुद बु. जिल्हा परिषद गट
विजयी
दादासाहेब लवटे (शिवसेना) १६ हजार १४२
पराभूत
बाळासाहेब ढाळे (आघाडी) ९ हजार ७८५
उत्तम खांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) १२३५
गणेश गोडसे (वंचित बहुजन आघाडी) २८३
स्वप्नील ढेरे (अपक्ष) ६५
नोटा १०८
महूद पंचायत समिती
विजयी
सोनाली उमेश पाटील (शिवसेना) ७६८२
पराभूत
मनिषा हरिदास येडगे (आघाडी) ५६५८
दिपाली नवल गाडे (शिवसेना ठाकरे) ५०३
नोटा १३५
चिकमहुद पंचायत समिती गण
विजयी
बाळासो मच्छिंद्र बंडगर (शिवसेना) ७५०२
पराभूत
राकेश रविंद्र कदम (आघाडी) ५५६६
बबन किसन चव्हाण (शिवसेना उबाठा) ३८७
नोटा १५१
एखतपूर जिल्हा परिषद गट
विजयी
सिंधुताई मोहन आलदर (आघाडी) १३५८२
पराभूत
शिला संपतराव माने (शिवसेना) ११०३७
रतन अनिल शेंडगे (राष्ट्रीय समाज पक्ष) ६८७
धनश्री बबन चव्हाण (अपक्ष) १२३
नोटा १९१
वाकी शिवणे पंचायत समिती गण
विजयी
स्मिता दीपक गोडसे (आघाडी) ६५०२
पराभूत
सुनिता धनाजी बाड (शिवसेना) ५३५१
धनश्री बबन चव्हाण १२२
नोटा ९९
एखतपूर पंचायत समिती
विजयी
सुवर्णा संजय नवले (आघाडी) ७४०९
पराभूत
ऋतुजा उद्धव जानकर (भाजप) ५१५६
रतन अनिल शेंडगे (रासप) ५४६
निता शंकर खरात १४९
नोटा १८६
जवळा जिल्हा परिषद गट
विजयी
अतुल प्रभाकर पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) २५०३१
पराभूत
सूर्यादित्य साळुंखे पाटील (आघाडी) १३५०४
मालोजी तानाजी पाटील (शिवसेना ठाकरे) १४०
अनिल बाळासो शेंडगे (रासप) १२०
दत्तात्रय खटके ४३
रणसिंह देशमुख १७
एकनाथ शेंबडे १९
हरिदास वाळके १७
नोटा ८७
वाढेगाव पंचायत समिती
विजयी
वंदना भरत शेळके (आघाडी) ६८७६
पराभूत
राणी गजानन उबाळे (शिवसेना) ६५२२
सिमा नवनाथ तोरणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) ९२३
नोटा १३५
जवळा पंचायत समिती
विजयी
पूनम सुदर्शन इंगवले (आघाडी) ८३७६
पराभूत
प्रज्ञा रघुनाथ गायकवाड (शिवसेना उबाठा) ४७७
भारती लालासाहेब देशमुख (भाजप) ३९८२
तृप्ती प्रशांत यादव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) १५३५
नोटा १५१
कडलास जिल्हा परिषद गट
विजयी
शोभाताई बाबासाहेब खटकाळे (शिवसेना) १६०९३
पराभूत
संगीता नंदकुमार शिंदे (आघाडी) ७४९०
संचिता टापरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) ३७८ अनुसया मेटकरी १२९
राणी टकले १०१
नोटा १०९
कडलास पंचायत समिती
विजयी
राणी सुरज पाटील (शिवसेना) ८९६३
पराभूत
धनाजी गणपत पवार (आघाडी) ३८२९
अजित विश्वनाथ गायकवाड (शिवसेना उबाठा) ४५३
नोटा १७१
अजनाळे पंचायत समिती
विजयी
बापू अशोक जावीर (आघाडी) ४१२४
पराभूत
मीनाक्षी परमेश्वर केंगार (शिवसेना) ४०१७
अक्षय बाळासो भजनावळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) २९२
शितल सचिन भडंगे (भारतीय जनता पार्टी) २८५९
प्रज्योत उमेश काटे २४०
परमेश्वर विठ्ठल केंगार १०७
नोटा १०७
चोपडी जिल्हा परिषद गट
विजयी ६८४७ मतांनी
चेतनसिंह केदार सावंत (भाजप) १४८४४
पराभूत
विजयकुमार शिंदे (आघाडी) ७९९७
विकास मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) ४६७
तानाजी केदार (आम आदमी पार्टी) १५१
श्रीधर केंगार (बसपा) १७०
उल्हास धायगुडे ११७४
एकनाथ शेंबडे ३६
रणसिंह देशमुख ४९
काकासो बंडगर ३०
नोटा ९६
राजुरी पंचायत समिती
विजयी
सदाशिव मारुती दबडे (भारतीय जनता पार्टी) ६९८२
पराभूत
समाधान शिवाजी रुपनर (आघाडी) ४७०७
काकासो सयाप्पा बंडगर (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी) १४२
प्रमोद भाऊसाहेब बाबर १४९
नोटा १२४
चोपडी पंचायत समिती
विजयी
अजय उत्तम सरगर (शिवसेना) ७१९६
पराभूत
अनिल आप्पासाहेब जगदाळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ५०४०
अतुल निवासराव फसाले (कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी) ४५८
नोटा २१८
कोळा जिल्हा परिषद गट
विजयी
केराप्पा पांढरे (आघाडी) १३७९०
पराभूत
संभाजी आलदर (भाजप) १२४७३
सचिन घाडगे (आम आदमी पार्टी) ७८
सदानंद पांढरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) ५२० सुदर्शन घेरडे (काँग्रेस) १२०
प्रफुल्ल कोकरे (अपक्ष) १०९
नोटा ९०
कोळा पंचायत समिती
विजयी
छाया सोपान कोळेकर (आघाडी) ६८३०
पराभूत
सुलाबाई शिवाजी घेरडे (शिवसेना) ६०७२
विद्या उल्हास बिले (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार).३५२
नोटा ११६
हातीद पंचायत समिती
विजयी
अमृत नारायण पाटील (आघाडी) ७०९२
पराभूत
पोपट रामचंद्र गडदे (भारतीय जनता पार्टी) ६४९८
समाधान नामदेव करडे १२५
नोटा ९५
घेरडी जिल्हा परिषद गट
विजयी
संगीता सोमा मोटे (सांगोला आघाडी) २३६१७
पराभूत
आरती श्रीकांत बुरुंगले (भाजप) ३४३९
वंदना रामचंद्र घुटुकडे (बसपा) ४८०
शुभांगी अनिल मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) ७१७३
नोटा २१४
सोनंद पंचायत समिती
विजयी
काजल मुकेश काशीद (आघाडी) ५७१८
पराभूत
सुषमा राहुल काशीद (शिवसेना) १६५९
स्वाती परेश खंडागळे (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) ४३५
अलका शशिकांत ढगे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९६
उषा शहाजी बाबर (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी) ६०२
ताई तानाजी काशीद १४६
वर्षा सुरेश गवंड २५६१
नोटा ९८
घेरडी पंचायत समिती
विजयी
अशोक नामदेव चोरमुले ५९५२
पराभूत
नवनाथ रामदास भोसले (भारतीय जनता पार्टी) ३५९१
श्रीनिवास मधुकर करे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) ३६७६
वंदना रामचंद्र घुटूकडे (बहुजन समाज पार्टी) १७०
परमेश्वर पांडुरंग गेजगे १६६
नोटा १४८


0 Comments