कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार शोभाताई खटकाळे,
पंचायत समिती कडलास गणातील उमेदवार राणीताई पाटील भरघोस मतांनी विजयी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला /प्रतिनिधी: महायुतीच्या कडलास जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार
सौ. शोभाताई बाबासाहेब खटकाळे यांना एकूण 16607 मते मिळाली. 8458 मतांची आघाडी मिळाली व त्यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे.
कडलास पंचायत समिती गणाच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ. राणीताई सुरज पाटील यांना एकूण 8963 मते मिळाली असून 3038 मतांची आघाडी मिळाली आहे.
उमेदवारांनी कडलास जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात प्रचार करून जनतेला आपलेसे केले .जनमानसातून या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता
. युवकनेते योगेशदादा खटकाळे यांनी कडलास जिल्हा परिषद गटात केलेल्या विकास कामामुळे
त्याचा फायदा म्हणून कडलास गटातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचंड बहुमतांनी विजय झाला.
कडलास गटात केलेल्या विविध विकासकामामुळे जनतेने व मतदारांनी योगेशदादा खटकाळे यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त केला.
मतमोजणीच्या पूर्वीच विजयाचा गुलाल आपलाच आहे असा ठाम आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्तकेला
.मान्यवर,पदाधिकारी ,कार्यकर्ते ,युवावर्ग, मतदार व ग्रामस्थांनी पुढील पाच वर्षात कडलास
गटाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी केले. फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्ता व जनतेने आनंदउत्सव साजरा केला.


0 Comments