Breaking News

धक्कादायक..ट्रॅक्टर ट्रॉलीतून खाली पडून ऊसतोडणी कामगाराचा मृत्यू.. सांगोला तालुक्यातील घटना

धक्कादायक..ट्रॅक्टर ट्रॉलीतून खाली पडून ऊसतोडणी कामगाराचा मृत्यू.. सांगोला तालुक्यातील घटना 


सांगोला : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून रोडवर खाली पडलेल्या ऊसतोडणी कामगाराच्या अंगावरून पाठीमागून येणारे अज्ञात वाहन गेल्याने चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. 

ही घटना सोमवारी (दि. २३) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास सांगोला-मिरज रोडवरील श्री हरी हॉटेल वाटंबरे जवळ घडल्याने ऊसतोडणी कामगार हळहळ व्यक्त करीत होते.

प्रभू बबन फुफाटे (३०, रा. भोकाडी, ता. शेगाव, जि. हिंगोली) असे मृताचे कामगाराचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. 

याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गगनबावडा, जि. कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील कारखान्याचा गळीत

टोळीतील इतर कामगार त्याचा मृतदेह घेऊन गावाकडे खाना झाले. तपास दीपक घोंगडे करीत आहेत.

हंगाम संपल्याने दोन ट्रॅक्टर ट्रॉलीमधून भोकाडी येथील ऊसतोडणी कामगारांची टोळी गगनबावडा येथून सांगोलामार्गे भोकाडी मूळ गावाकडे निघाली होती. 

वाटेत मिरज-सांगोला रोडवरून ट्रॅक्टर जात असताना पाठीमागील ट्रॉलीत झोपेतील प्रभू फुफाटे हा ऊसतोडणी कामगार रोडवर खाली पडला. त्याक्षणी त्याच्या शेजारी झोपलेल्या दुसऱ्या ऊसतोडणी कामगाराला प्रभू खाली पडल्याचे लक्षात येताच

 त्यांनी चालकाला ओरडून ट्रॅक्टर थांबवला तोपर्यंत पाठीमागून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाखाली चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. सांगोला ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी त्याचे शवविच्छेदन केले.

Post a Comment

0 Comments