google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..बांधकाम साहित्य खाली करण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय इसमाचा टिपरच्या चाकाखाली सापडून मृत्यू सांगोला शहरातील घटना..

Breaking News

खळबळजनक..बांधकाम साहित्य खाली करण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय इसमाचा टिपरच्या चाकाखाली सापडून मृत्यू सांगोला शहरातील घटना..

खळबळजनक..बांधकाम साहित्य खाली करण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय इसमाचा टिपरच्या चाकाखाली सापडून मृत्यू सांगोला शहरातील घटना..


सांगोला : बांधकाम साहित्य खाली करण्यासाठी टिपर पाठीमागे घेत असताना चालकास पाठीमागील इसमाचा अंदाज न आल्याने टिपरच्या चाकाखाली सापडून ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.

 ही घटना रविवारी (दि. २२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सांगोला शहरातील त्रिमूर्ती टॉकीजसमोर घडली. राजेंद्र विजयकुमार देशपांडे (५५. रा.कोष्टी गल्ली, सांगोला) असे मृताचे नाव आहे.

याबाबत गोपाल विजयकुमार देशपांडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात टिपरचालकावर गुन्हा दाखल केला. शहरातील कोष्टी गल्ली या ठिकाणी व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू 

असून, बांधकाम साहित्य खाली करताना चालकाने आपल्या ताब्यातील टिपरमधील (क्र. एमएच ४५ एएक्स ६२२९) बांधकाम साहित्य खाली करताना राजेंद्र देशपांडे यास पाठीमागून जोराची धडक दिली.

Post a Comment

0 Comments