सांगोला वाढेगाव जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात;
अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील महिलेच्या जागीच मृत्यू , तर तिघेजण गंभीर जखमी...
सांगोला तालुक्यातील वाडेगाव जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका महिलेचा जागेच मृत्यू झाला
असून,कार मधील इतर तिघेजण गंभीर जखमी झाली असल्याची घटना वाडेगाव तालुका सांगोला येथील राज लॉज जवळ काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली
असून अपघातामध्ये देवका सोरटे वय वर्ष 36 राहणार करवीर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. असे मृत महिलेचे नाव आहे याबाबत सांगोला पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,देवका सोरटे व त्यांच्या समावेश इतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास 4:30 वाजण्याच्या सुमारास चार चाकी वाहनाने कोल्हापूर कडे जात होत्या, त्यावेळी वाडेगाव येथील
महामार्ग क्रमांक 166, राज लॉज जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात देवका सोरटे गंभीर जखमी झाल्या, अपघातानंतर विशाल गडहिरे यांनी तात्काळ
उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे दाखल केले ,मात्र सकाळी नऊच्या सुमारास वैद्यकीय अधिकारीनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले.
अपघातग्रस्त कारमधील इतर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस स्टेशनमध्ये आकस्मत मृत्यूचे नोंद करून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहे.
याबाबत महामार्ग पोलीसांनी तात्काळ जखमीना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग शरद शिंपणे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील,
पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष चौरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल बोरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड, भगत यांच्या पथकाने जखमीना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.


0 Comments