Breaking News

राजापुरात विकासाचा ऐतिहासिक सोहळा! जिल्हा परिषद सदस्य मा. अतुल (मालक) पवार यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप

राजापुरात विकासाचा ऐतिहासिक सोहळा! जिल्हा परिषद सदस्य मा. अतुल (मालक) पवार यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

राजापुर | प्रतिनिधी राजापुर गाव दि. २८ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी विकासाच्या नव्या पर्वाचा साक्षीदार ठरणार आहे. जिल्हा परिषद सदस्य मा. अतुल (मालक) पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत

 मुलींसाठी भव्य सायकल वाटप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शिक्षणासाठी झटणाऱ्या विद्यार्थिनींसाठी हा उपक्रम ऐतिहासिक ठरणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

शाळा-कॉलेजसाठी दूरवर पायपीट करणाऱ्या मुलींना आता सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या सायकलींमुळे मुलींचा वेळ वाचणार, शिक्षणात सातत्य राहणार आणि आत्मविश्वास दुणावणार आहे. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणारा

 हा निर्णय राजापुरच्या विकासाच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मा. अतुल (मालक) पवार यांनी पुन्हा एकदा कृतीतून आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

 “मुलगी शिकली तर कुटुंब आणि समाज घडतो” या विचाराला मूर्त स्वरूप देणारा हा उपक्रम असल्याची भावना पालकवर्गातून व्यक्त होत आहे.कार्यक्रमासाठी गावात उत्साहाचे वातावरण

 असून मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि युवक उपस्थित राहणार आहेत. राजापुर गावासाठी हा दिवस केवळ सायकल वाटपाचा नसून मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले ठोस पाऊल ठरणार आहे.

राजापुर सज्ज आहे…

मुलींच्या स्वप्नांना गती देणाऱ्या या ऐतिहासिक क्षणासाठी!

Post a Comment

0 Comments