google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळामार्फत सांगोला विद्यामंदिर प्रशालेची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड

Breaking News

सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळामार्फत सांगोला विद्यामंदिर प्रशालेची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड

सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळामार्फत सांगोला विद्यामंदिर प्रशालेची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 सांगोला/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ संलग्न असणार्‍या सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने

 सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आदर्श शाळा पुरस्कारासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशालेची निवड करण्यात आली आहे.

सांगोला विद्यामंदिर प्रशालेमार्फत विज्ञान विषयाच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेले सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांना विज्ञान व प्रज्ञा परीक्षेसाठीचे प्रयत्न, विज्ञान प्रदर्शन, 

विज्ञान प्रकल्प,विज्ञान प्रश्‍नमंजुषा तसेच विविध विज्ञान विषयाच्या उपक्रमामध्ये घेतलेला सक्रिय सहभाग यांचा सखोल आढावा घेण्यात आला. 

विद्यामंदिर प्रशालेची विज्ञान विषयातील प्रगती, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या सर्व बाबींचा विचार करून सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सदर पुरस्कार वितरण 1 मार्च 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता राजयोग हॉल करमाळा येथे होणार्‍या 13 व्या राज्यस्तरीय विज्ञान अधिवेशनामध्ये करण्यात येणार आहे.

सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ड विजयसिंह चव्हाण,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारणी सदस्य शीलाकाकी झपके, विश्‍वेश झपके, 

सर्व संस्था सदस्य, प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,उपमुख्याध्याक चिंतामणी देशपांडे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे,उत्तम सरगर, काकासो नरुटे यांचे मार्फत प्रशालेतील सर्व विज्ञान विषय शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments