सांगोले नगरपरिषदेचे सन २०२६-२७ साठीची अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोले नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये दि.१६/०२/२०२६ रोजी अर्थसंकल्पीय मा. विशेष सर्वसाधारण सभा संपन्न होवून नगरपरिषदेचे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या सुधारीत व सन २०२६-२७ च्या प्रस्तावित अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली.
मा. मुख्याधिकारी यांनी तयार केलला व मा. स्थायी समितीने सुचविलेल्या दुरुस्त्या व शिफारशीसह अर्थसंकल्प मा. विशेष सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्यात आला. मा. विशेष सर्वसाधारण सभेसमोर नगराध्यक्ष मा. श्री. आनंदा गोरख माने यांच्यावतीने नगरपरिषदेचे लेखापाल
श्री.हरीभाऊ काळे व लेखापरिक्षक श्री. लहु लेंगरे यांनी अर्थसंकल्प सादर केला. सदर अर्थसंकल्पामध्ये जमा बाजूस आरंभीच्या शिल्लकेसह महसुली जमा व शासन अनुदाने अशी एकुण रक्कम रु. २२९,७९,७४,५३९/- इतकी जमा
दर्शविण्यात आली आहे, खर्च बाजूस महसुली व शासन अनुदानामधुन खर्च रक्कम रु, २२९,७८,२३,७४०/- इतकी दर्शविण्यात आली आहे व अखेर शिल्लक रक्कम रु. १,५०,७९९/- इतकी दर्शविणेत आलेली आहे.
सभागृहामध्ये सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी प्रदान करणेत आली आहे. अर्थसंकल्पामध्ये नगरोत्थान अभियान राज्यस्तर (भुयारी गटार योजना), अधिसुचित विशिष्ठ नागरी सेवा
सुविधा पुरविणेसाठी अनुदान, नगरोत्थान अभियान जिल्हास्तर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना, दलितेत्तर योजना, वैशिष्ट्यपुर्ण् योजना, विशेष वैशिष्ट्यपुर्ण योजना, विशेष रस्ता अनुदान,
अल्पसंख्यांक बहूल क्षेत्र विकास योजना, रमाई आवास घरकुल योजना, शाश्वत विकास धोरण, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, इत्यादी कामी तरतुद करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे शहरातील बगीचे, इमारतीं बांधकाम, स्मशान भुमी/ दफनभुमी सुधारणा, नविन रस्ते व शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, नविन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, आवश्यक विद्युत व्यवस्था,
नागरीकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळणेसाठी पाणीशुध्दीकरण यंत्रणा बसविणेसाठी तरतुद करण्यात आली आहे. तसेच महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण व दुर्बल घटकांसाठी विधिवत तरतुद करण्यात आली आहे.
शहरामध्ये राष्ट्र पुरुषांचे व समाज सुधारकांचे पुतळे सुशोभिकरण करणे कामी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतुद करण्यात आली आहे. नगरपरिषदेस नगरोत्थान अभियान राज्यस्तर (भुयारी गटार योजना) अनुदान मंजुर असून
सदर मंजुर अनुदानामधून सांगोला शहरातील सांडपाण्याची शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केल्याने पर्यावरण सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहरामध्ये पर्यावरण पुरक उपक्रम जोपासला जात आहे.
सभेस अध्यक्ष मा. श्री. आनंदा गोरख माने, उपाध्यक्ष मा. श्री. नितीन विठ्ठल इंगोले, मुख्याधिकारी डॉ. श्री. सुधीर गवळी, सर्व विषय समित्यांचे सभापती व सर्व नगरसेवक, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
डॉ. श्री. सुधीर गवळी,
मुख्याधिकारी
नगरपरिषद सांगोले
सांगोला शहराच्या प्रगतीला नवी गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आज दि. १६-०२-२०२६ रोजी नगरपरिषदेचा
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा सुधारीत अर्थसंकल्प आणि सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सर्वानुमते मंजुर करण्यात आला आहे. शिक्षण,
आरोग्य,रस्ते, पाणीपुरवठा आणि पर्यावरण या सोबतच विद्यार्थी , युवक, महिला,
जेष्ठ मंडळी व दिव्यांग बांधवासाठी विशेष तरतुदींचा या अर्थसंकल्पात समावेश आहे. चला, “समृध्द आणि स्मार्ट सांगोलेच्या निर्मीतीत सहभागी होऊया”
“नियोजन सांगोलेच्या शाश्वत विकासाचे”
श्री. आनंदा माने
नगराध्यक्ष


0 Comments