google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील १३ गावांत सरपंचपदासाठी पोटनिवडणूक

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील १३ गावांत सरपंचपदासाठी पोटनिवडणूक

सोलापूर जिल्ह्यातील १३ गावांत सरपंचपदासाठी पोटनिवडणूक


सोलापुर जिल्ह्यातील विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या १३ सरपंचांच्या आणि २७ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

 राज्य निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला असून, फेब्रुवारी अखेरीस प्रत्यक्ष मतदानाचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

राजीनामा, अपात्रता, मृत्यू किंवा मागील निवडणुकीत नामनिर्देशन पत्र न मिळाल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. आता या जागा भरण्यासाठी १ जुलै २०२५ च्या अर्हता तारखेनुसार तयार करण्यात आलेल्या

 मतदार याद्यांच्या आधारे ही निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार मतदार यादीचा महत्त्वाचा कार्यक्रम १६ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

त्यानंतर १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान मतदार यादीवर हरकती व सूचना स्वीकारल्या जातील, तर २४ फेब्रुवारीला अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होईल. 

सरपंचांशिवाय सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण २७ जागांसाठीही चिणके, चिकमहूद, खवासपूर, वडशिंगे, भोसरे, पानीव, कोळेगाव, हसापूर, हजगी, सुलतानपूर, कोन्हाळी, चुंब,

देवगाव, उंबरगे, ईश्वर वठार, तोगराळी-गुर्देहळ्ळी, मनगोळी, मंद्रूप, कुसूर खानापूर, शंकरनगर, शंकरगाव, तरटगाव, जिंती, भिलारवाडी, डिकसळ याठिकाणी निवडणूक होणार आहे.

 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यानंतर आता ग्रामीण भागाचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले आहे.

सरपंचपदासाठी 'या' गावांत होणार निवडणूक

सांगोला: अनकढाळ

माळशिरस: कोळेगाव, लोटे-मोहितेवाडी

अक्कलकोट: रुद्देवाडी, सलगर, कोन्हाळी

बार्शी: मांडेगाव

दक्षिण सोलापूर: वांगी, दर्शनळी

करमाळा: कात्रज, रिटेवाडी

मोहोळ: यावली

मंगळवेढा: फटेवाडी (येथे सरपंचासह ७ सदस्यांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण गावाची निवडणूक होणार आहे.)

Post a Comment

0 Comments