Breaking News

नेतृत्व म्हणजे फक्त आवाज नाही, कामाची धमक असावी लागते – मा. अतुल (मालक) पवार

नेतृत्व म्हणजे फक्त आवाज नाही, कामाची धमक असावी लागते – मा. अतुल (मालक) पवार


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

जिल्हा परिषद जवळा गटात मा. श्री. अतुल (मालक) पवार यांच्या प्रचार शुभारंभात विकासकामांचा धडाका; घड्याळाला चिन्हाला मत हीच दादांना खरी श्रद्धांजली 

सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण तापवणारा मा. श्री. अतुल (मालक) पवार यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

 या प्रचार शुभारंभाने केवळ निवडणूक रणधुमाळीच सुरू केली नाही, तर गेल्या काळात झालेल्या विकासकामांचा धडाका जनतेसमोर पुन्हा एकदा ठळकपणे मांडला.

शाळकरी मुलींसाठी 2000 सायकल वाटप, गावागावातील रस्ते विकास, लाईट पोल उभारणी, पाणी, वीज आणि मूलभूत सुविधांसाठी सातत्याने केलेली 

कामे यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना स्पष्टपणे दिसून आली. प्रचारादरम्यान घरोघरी जाऊन थेट संवाद, तसेच कॉर्नर सभांमधून विकासाचा हिशेब मांडण्यात आला.

या प्रचार शुभारंभास नागरिकांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद लाभला. महिला, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक सर्व घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 “बोलणं नाही तर काम महत्त्वाचं” या भूमिकेवर ठाम असलेल्या मा. अतुल (मालक) पवार यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.

यावेळी उपस्थित नागरिकांनी “घड्याळाला मत देणे हीच दादांना खरी श्रद्धांजली” अशी भावना व्यक्त करत विकासासाठी घड्याळ चिन्हालाच साथ देण्याचा निर्धार केला. 

सांगोला तालुक्यात नेतृत्वाची खरी ओळख काय असते, हे शब्दांनी नाही तर कामातून दाखवून देणारे नाव म्हणजे मा. श्री. अतुल (मालक) पवार

. “नेतृत्वामध्ये धमक ताकद असावी लागते; आमचा आवाज चढत नाही, आमचं काम बोलतं” या ठाम शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.

जवळा गटासह परिसरात सुरू असलेल्या जोरदार प्रचारात विकासकामांचा अक्षरशः धडाका पाहायला मिळत आहे. शाळकरी मुलींच्या शिक्षणासाठी 2000 सायकलींचे वाटप, गावोगावी रस्त्यांची कामे

, लाईट पोल उभारणी, तसेच ठिकठिकाणी कॉर्नर सभा आणि घरोघरी जाऊन थेट संपर्क साधणारा प्रचार यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रचार शुभारंभापासूनच नागरिकांचा मोठा, उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून युवक, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक सर्व स्तरांतून विकासकामांबद्दल समाधान व्यक्त होत आहे. “बोलघेवडेपणापेक्षा कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व आम्हाला हवे” अशी भावना नागरिकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

मा. अतुल (मालक) पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा प्रचार म्हणजे केवळ निवडणूक मोहीम नसून, विकासावर आधारित विश्वासाचा जनआंदोलन ठरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments