कडलास जिल्हा परिषद गटातील व अजनाळे गणातील
महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी आमची ताकद मतपेटीतून दाखवून देवू : चिणके ग्रामस्थांचा निर्धार
श्री सोनारसिद्ध व श्री. सिद्धनाथ मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा केला शुभारंभ मतदारांनी विरोधकांना आपली ताकद मतपेटीतून दाखवावी: योगेशदादा खटकाळे
सांगोला /प्रतिनिधी: कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई बाबासाहेब खटकाळे ,
अजनाळे गणाच्या उमेदवार शितल सचिन भडंगे या उमेदवारांच्या प्रचारार्थ चिणके गावातील श्री.सोनार सिद्ध मंदिर व सिद्धनाथ मंदिर येथे असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अशोक शितोळे , आगतराव मिसाळ, नारायण मिसाळ,डॉ.नवनाथ मिसाळ आपल्या मनोगतात म्हणाले, कडलास
जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई खटकाळे यांचे चिन्ह धनुष्यबाण आहे. तर अजनाळे गणाच्या उमेदवार शितल सचिन भडंगे यांचे चिन्ह कमळ असून या महायुतीच्या उमेदवारांना चिणके गावातून प्रचंड असे लीड देऊ,
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व युवानेते योगेशदादा खटकाळे यांनी चिणके गावासाठी अनेक सोयी -सुविधा व विकासकामे केली आहेत . बापूंच्या व योगेशदादांच्या माध्यमातून चिणके गावाचा उर्वरित विकास पूर्ण होईल.
विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आम्ही दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करू, विजयाचा गुलाल हा आपलाच आहे असा पक्का व ठाम निर्धार चिणके ग्रामस्थांनी व्यक्त केला.
यावेळी युवानेते योगेशदादा खटकाळे म्हणाले, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून चिणके गावात खूप विकासकामे झाली आहेत. भविष्यात उर्वरित विकासकामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
महापुरुष हे आपले आदर्श आहेत याची जाणीव सर्वांनीच बाळगली पाहिजे .राजकारण हे योग्य दिशेने चालले पाहिजे. चिणकेकरांनी आपली ताकद व शक्ती मतपेटीतून विरोधाकांना दाखवून द्यावी.
गावच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे .पुढील पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आम्ही बांधील आहोत असे योगेशदादा खटकाळे यांनी चिणके ग्रामस्थांना आश्वासित केले.
यावेळी उद्योगपती बाळासाहेब आसबे म्हणाले, कार्यकर्ते, पदाधिकारी व जनतेला दिलेला शब्द आम्ही मोडणार नाही. तुम्ही यावेळी आम्हाला सढळ हाताने मतदान करा येणारी पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आम्ही देऊ.
यावेळी अजनाळे गणाच्या महायुतीच्या उमेदवार शितल सचिन भडंगे म्हणाल्या, अजनाळे गणातील विकास कामासाठी मला मतदान करून सेवा करण्याची संधी द्यावी.
योगेशदादा खटकाळे व आम्ही पाच वर्ष गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहू.समाजातील सर्व घटकासाठी आम्ही विकास कामे राबवू. विरोधकांनी सुडाचे व नाटकी राजकारण करू नये.
यावेळी कडलास गटाच्या महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार शोभाताई खटकाळे, व अजनाळे गणाच्या भाजपच्या उमेदवार शितल सचिन भडंगे,
तसेच तानाजी कवठेकर ,रामचंद्र मिसाळ, रमेश खंडागळे, नारायण कुटे, कृष्णदेव मिसाळ ,आगतराव भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष संजय मिसाळ, शंकर हेगडे, रमेश काटे ,माजी सरपंच गुणवंत काटे,
चेअरमन भागवत पाटील ,भाऊसाहेब खटकाळे ,बिभिषण मिसाळ, गणेश मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य विमल मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य सविता शितोळे, कांताबाई मिसाळ, सुनिता मिसाळ, स्वाती मिसाळ, प्रेरणा शितोळे, संगिता केदार ,
अर्चना खटकाळे, अंजना देशमुख, शारदा खटकाळे, सुवर्णा मिसाळ , तृप्ती खटकाळे ,रेश्मा खटकाळे, प्रियंका खटकाळे,
सविता चंदनशिवे ,यांच्यासह आदी मान्यवर, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवावर्ग , महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





0 Comments