सत्तेशिवाय विकास शक्य नाही; सांगोल्याच्या प्रगतीसाठी महायुतीची सत्ता गरजेची” –
शहाजीबापू पाटील लोणविरे, हणमंतगाव, निजामपूर, राजुरी गावांमध्ये महायुतीच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर जिल्हा परिषद व पंचायत समितीत महायुतीची सत्ता असणे अत्यावश्यक आहे.
येत्या चार वर्षात तालुक्यातील सर्वच सिंचन प्रकल्पाचे काम मार्गी लावून सर्वच शेती सिंचनाखाली आणण्याचा निर्धार केला आहे. सत्तेबरोबर राहिल्यासच विकासकामांना गती मिळते.
जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठीच आपल्याला सत्तेत सहभागी व्हायचे आहे. सत्तेशिवाय विकास शक्य नाही, त्यामुळे सांगोल्याच्या प्रगतीसाठी महायुतीची सत्ता गरजेची आहे, असे स्पष्ट मत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत, चोपडी पंचायत समिती गणाचे उमेदवार अजय सरगर,
राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ.सदाशिव दबडे यांच्या प्रचारार्थ लोणविरे, हणमंतगाव, निजामपूर, राजुरी येथे प्रचार सभा घेण्यात आली.
यावेळी बोलताना माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, तालुक्याच्या विकासासाठी माझी स्पष्ट दूरदृष्टी असून माझी स्वप्ने वेगळी आहेत. सांगोला तालुक्यातील एकही गाव शेतीच्या व पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही,
यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. 1995 आणि 2019 मध्ये आमदार झाल्यानंतर तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.
जनतेचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. नगरपालिकेत आपली सत्ता आली असून आता जिल्हा परिषद व पंचायत समितीतही महायुतीची सत्ता खेचून आणायची आहे. सांगोला तालुक्याच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,” असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चोपडी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. तळागाळातील लोकांना
सोबत घेऊन सर्वागीण विकास हाच अजेंडा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. जिल्हा परिषद स्तरावरून गटात राबवता येणाऱ्या विविध विकास योजनांची सविस्तर माहिती दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण, शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, जलजीवन मिशनअंतर्गत नळजोडणी, वीजपुरवठ्यातील अडथळे दूर करणे,
आरोग्य उपकेंद्रे बळकट करणे, शाळांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, तसेच स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनावर भर देण्यात येणार असल्याचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
यावेळी उद्योगपती बाळासाहेब एरंडे, प्रशांत वलेकर, लोणविरे गावचे माजी सरपंच सुनील पाटील, डी.एस.सावंत सर, हणमंतगाव येथील
विकास सेवा सोसायटी चेअरमन संतोष खांडेकर, नाथा कोळेकर, माजी सरपंच भीमराव खांडेकर, दत्ता बंडगर, सुभाष खांडेकर, निजामपूर येथील चेअरमन मधुकर लवटे, मधुकर कदम,
माजी सरपंच मोहन कोळेकर, देवाप्पा लवटे, उपसरपंच सोपान कदम, सतीश हिवरे, भाजपचे तालुका चिटणीस संतोष काळे, राजुरी येथील सरपंच दादासाहेब व्हळगळ, माजी सरपंच रामभाऊ दबडे, प्रकाश दबडे, माजी चेअरमन आनंदा बंडगर, सुखदेव खुळे,
दगडू आप्पा खुळे, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ घोंगडे, विकास सेवा सोसायटी चेअरमन पांडुरंग दबडे, व्हा.चेअरमन तुकाराम सुरवसे, बाळासाहेब बिसले, दिलीप बंडगर, ग्रामपंचायत सदस्य तानाजी चौंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी बंडगर,
रावसाहेब कुटे, अंकुश कुटे, माजी उपसरपंच आत्माराम काटे, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान काटे, उपसरपंच महेश काटे, आप्पासाहेब व्हळगळ, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र माने, साहेबराव दबडे, संतोष दबडे, सूर्यकांत खुळे,
संतोष येजगर, मनोज व्हरगर, भारत काटे, प्रकाश बिसले, सुखलाल बंडगर, गजानन काळे, श्रीमंत कुटे, नितीन बंडगर, शिवाजी चौडे, दगडू काशिद, दिलीप बिसले, दीपक सुतार, दिलीप दबडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.




0 Comments