Breaking News

विकासाच्या पोकळ गप्पा आणि निवडणुकीत अर्थकारण करणाऱ्या नेत्यांनो मतदारांना गृहीत धरू नका:- ॲड. अभिषेक कांबळे.अभद्र युती-आघाडी करून जनतेला गंडा घालणाऱ्या नेत्यांना जनता निश्चितच जागा दाखवेल...

विकासाच्या पोकळ गप्पा आणि निवडणुकीत अर्थकारण करणाऱ्या नेत्यांनो मतदारांना गृहीत धरू नका:-


ॲड. अभिषेक कांबळे.अभद्र युती-आघाडी करून जनतेला गंडा घालणाऱ्या नेत्यांना जनता निश्चितच जागा दाखवेल...

सांगोला / तालुका प्रतिनिधी.

सांगोला तालुक्यात सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना तालुक्यातील चळवळीमध्ये नेहमीच अग्रेसर असणारे काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष तथा लहुजी पॅंथर सेनेचे संस्थापक ऍड.अभिषेक कांबळे यांनी वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

सांगोला तालुक्यातील नेत्यांच्या आप-आपल्या सोयीनुसार प्रत्येक निवडणुकीमध्ये अभद्र अशी युती आणि आघाडी करून सर्वसामान्य नागरिकांच्या व मतदारांच्या

 मनाशी प्रतारणा करून स्वतःचे राजकीय भविष्य चमकवण्याची जणू काही स्पर्धाच लागली असून अशा स्वार्थी नेत्यांच्या संधीसाधू उमेदवारांना सर्वसामान्य जनतेने पुरते ओळखले आहे.

 या निवडणुकीमध्ये उमेदवारी वाटप पासूनच नको ते निकष लावून उमेदवाऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत यामध्ये तालुक्याचे व आपल्या गटाचे सर्वांगीण विकास करण्याच्या थापा जरी उमेदवारांकडून मारल्या जात आहेत

 या वलग्ना निवडणूक काळात मतदारांची व जनतेची दिशाभूल करून आपल्या झोळीमध्ये  मते पाडण्यासाठी चे केविलवाणी प्रयत्न जनतेने वेळीच ओळखावे असे आवाहन ऍड.अभिषेक कांबळे यांनी केले आहे. 

त्यामुळे तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मैदानात असलेल्या कोणत्या उमेदवारांना ऍड.अभिषेक कांबळे यांच्या भूमिकेचा फटका बसणार.?आणि कोणत्या उमेदवाराला त्यांचा फायदा होईल ? याकडे राजकीय वर्तुळातील उमेदवार व नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट:-

ऍड.अभिषेक कांबळे यांचा जनसंपर्क व मॅरेथॉन बैठका सुरू; भूमिकेकडे राजकीय नेते व उमेदवारांचे लक्ष.! काँग्रेस पक्षाचे माजी.तालुकाध्यक्ष तथा लहुजी पॅंथर सेनेचे संस्थापक ऍड.अभिषेक कांबळे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातील समविचारी लोकांसोबत संपर्क वाढविला

 असून जिल्हा परिषद व पंचायत समिती गण निहाय समविचारी लोकांनी कोणाला मतदान करावे याबाबत गावोगावी संपर्क व बैठका घेत चाचपणी करून समविचारी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे.

Post a Comment

0 Comments