सांगोला शहरात शिवजयंतीनिमित्त शिवतिर्थ येथे रक्तदान, आरोग्य शिबिर व खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यातील शिवतिर्थ येथे सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा समावेश आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शिवतिर्थ येथे रक्तदान शिबिर, सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
“Donate Blood, Save Life” या संदेशातून नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यानंतर सायंकाळी ८ ते रात्री ११ या वेळेत मोठ्या गटासाठी खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम २० स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार असून प्रवेश फी १००० रुपये ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम बक्षिस १५,११९ रुपये (सौजन्य – सचिन ज्वेलर्स, सांगोला – सुभाष मिसाळ), द्वितीय बक्षिस ११,११९ रुपये
(माऊली शॉपी, सांगोला – निखिल पवार), तृतीय बक्षिस ७,७१९ रुपये (श्रीमंत मेन्स वेअर, सांगोला – धीरज पवार) तर चतुर्थ बक्षिस ७,५१९ रुपये (हॉटेल माऊली, वाटंबरे – प्रमोद सावंत व दीपक शिंदे) असे ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी काही नियम व अटी ठेवण्यात आले असून प्रत्येक स्पर्धकाला ५ मिनिटांचे एक गाणे सादर करता येईल. स्पर्धकांनी स्वतःचे गाणे स्वतः आणणे आवश्यक आहे.
नावनोंदणीची अंतिम तारीख १८ फेब्रुवारीपर्यंत असून इच्छुकांनी ८३२९७५२४२४ किंवा ९१६८२७५०२७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
या उपक्रमांमुळे शिवजयंती उत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूप प्राप्त होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments