google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक...इंदापूरनजिक सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; सांगोला तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर!

Breaking News

धक्कादायक...इंदापूरनजिक सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; सांगोला तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर!

धक्कादायक...इंदापूरनजिक सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात;




सांगोला तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर!

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 2 परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास भीषण अपघात घडून 

तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोचा (एमएच 13 सीयू 5163) टायर अचानक पंचर झाला. 

चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले; मात्र ते अर्धवट आणि धोकादायक स्थितीत उभे असल्याचे सांगितले जाते.

त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या मारुती सुझुकी इको (एमएच 12 एक्सई 8816) या चारचाकी

 वाहनाने उभ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की इको गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला.

या अपघातात इको गाडीत प्रवास करणाऱ्या सहा जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये आदिती अमर हातेकर (वय 25), सखुबाई ईश्वर गेजगे

 (वय 60) आणि जय अमर हातेकर (वय 2, सर्व रा. सांगोला, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे. या घटनेने हातेकर आणि गेजगे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातात इकोचे चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय 50, रा. पाटस) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 तसेच स्वाती कबीरदास गेजगे (वय 34) व समृद्धी कबीरदास गेजगे (वय 10 महिने, दोघी रा. पाटस) या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना त्वरित जवळील रुग्णालयात हलविण्यात आले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 दरम्यान, महामार्गावर उभ्या असलेल्या बिघडलेल्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चर्चा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments