सांगोला शहरातील ट्राॅमा सेंटरचे बांधकाम पुर्ण होऊन सुद्धा अपुरी यंत्रसामग्री व अपुरा
कर्मचारी वर्ग ट्राॅमा सेंटर बंद असुन सरकारने ते ताबडतो सुरू करावे...लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख आक्रमक..
लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागणीवर बोलताना
सांगोला शहरातील ट्राॅमा सेंटरचे बांधकाम पुर्ण होऊन सुद्धा अपुरी यंत्रसामग्री व अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे हे ट्राॅमा सेंटर बंद असुन सरकारने ते ताबडतो सुरू करावे...
ग्रामीण भागात विशेषत महिलांच्या गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर होत आहे
याचा विचार करुन महिलांची स्क्रीनींग टेस्ट विशेषता किमो थेरपी व रेडीओ थेरपी साठी शासनाने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे
भाळवणी गावात ग्रामीण रुग्णालय मंजुर असुन त्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी शासनाने आजुन निधी उपलब्ध करून दिला नाही तरी तो निधी तात्काळ देण्यात यावा.
तसेच भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र भंडीशेगाव येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहे त्यासाठी सुध्दा निधी उपलब्ध करून द्यावा..
माझ्या मतदारसंघातील व राज्यातील इतर ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती जिर्ण झाल्या आहेत त्या दुरुस्त्या शासनाने त्वरीत कराव्यात
तसेच भारत हे मधुमेह (डायबेटीस)या रोगाची राजधानी बनली आहे तरी गावोगावी आसे पेशंट आहेत त्यांचा परीणाम किडनीवर होतो त्यासाठी प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात डायलेसीस मशीन उपलब्ध करुन द्यावे.
कोळा व कोळा भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे याचा विचार करुन कोळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करावे
कुत्रा चावल्यानंतर जी श्वानदंश लस दिली जाते तीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असुन सरकारने ति लस उपलब्ध करून दिली जावी.
सोलापूर जिल्ह्यातील सोळा शिवभोजन केंद्राचे अनुदान प्रलंबित आहे ते देण्यात यावे व सांगोला शहरात ताबडतोब शिवभोजन केंद्र सुरु करावे
नवीन रेशनकार्ड धारकांना रेशनचा माल मिळत नाही तो मिळावा तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील लोकसंख्येचा विचार करुन तालुक्याला ईष्टांक वाढवून मिळावा..
राज्यात दोनहजार ग्राम रोजगार सेवक अत्यल्प मानधनात काम करीत आहेत त्यांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय झालेला असताना त्यांना ती वाढ आजुन मिळत नाही ती देण्यात यावी.
ग्रामीण भागात विस हजार संगणक परीचालक आहेत ते जवळ जवळ चौदा वर्षांपासून ते ग्रामीण जनतेचे आँनलाईन आॕपलाईन सेवा करतात त्यांच्या मानधानात वाढ करुन त्यांना यावलकवर समीतीच्या शिफारशी नुसार कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा..


0 Comments