google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तलाठी व मंडळ अधिकारी यांचा कारनामा उघड ! सिलिंग जमीनीच्या ७/१२ उता-यावर खाडाखोड करून शासनास व नागरिकांना लाखों रुपयांचा घातला गंडा.

Breaking News

सांगोला तलाठी व मंडळ अधिकारी यांचा कारनामा उघड ! सिलिंग जमीनीच्या ७/१२ उता-यावर खाडाखोड करून शासनास व नागरिकांना लाखों रुपयांचा घातला गंडा.

सांगोला तलाठी व मंडळ अधिकारी यांचा कारनामा उघड ! सिलिंग जमीनीच्या ७/१२ उता-यावर खाडाखोड करून शासनास


व नागरिकांना लाखों रुपयांचा घातला गंडा.

तलाठी मंडळ अधिकारी यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून,सदर जमीन सरकार जमा करावी - उमेश मंडले

सांगोला तालुका प्रतिनिधी :- सांगोला ता.सांगोला जि.सोलापूर येथील सिलिंग जमीन सर्वे नंबर ३७४/२अ क्षेत्र २ हे १० आर हि जमीन श्री. मधुकर नामदेव सावंत यांना दि.१८/१०/१९७७ रोजीचे फेरफार नंबर ७९५४ अन्वये वाटप करण्यात आली होती.

सदर जमीन राजकुमार संदीपान जाधव यांना विक्री करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून श्री. मधुकर नामदेव सावंत यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. सदर श्री. मधुकर नामदेव सावंत यांच्या अर्जानुसार,सदर जमिनीची ५०% अनर्जित रक्कम भरून घेवुन, जमीन खरेदी घेणार

 श्री. राजकुमार संदीपान जाधव यांना,सदरची जमीन शेती प्रयोजनासाठी (कृषी कारणासाठी) नवीन शर्तीवर खरेदी करण्यास खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली होती.

अटी व शर्ती 

१) उक्त जमिनीची विक्री शेती प्रयोजनासाठीच (कृषी करण्यासाठी )करावी.

२) उक्त जमिनीची ५०% अनर्जित रक्कम रु.९,३१,०५०/- खरेदी-विक्री व्यवहारापोटी शासकीय खजिन्यात त्वरित भरणा करावी. त्यानंतरच उक्त जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार करावा.

३) उक्त जमीन श्री राजकुमार संदीपान जाधव यांनाच विक्री करावी. नियोजित खरेदीदार यांनी जमिनीचा वापर शेती प्रयोजनासाठी (कृषी कारणासाठी) नवीन शर्तीने करावा.

४) शेती व्यतिरिक्त  वापरास बिनशेती दराने बाजारभावाचे ७५% रक्कम भरण्यास पात्र असा शेरा ७/१२ ला इतर हक्कात २ हेक्टर १० आर क्षेत्रात ठेवावा. व शेती व्यतिरिक्त वापरास सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेण्याची आहे.

५.उक्त जमिनीची खरेदी-विक्री व्यवहार सदर आदेशाच्या दिनांक पासून १ महिन्याच्या आत करावा.

६) उक्त जमिनीचे या आदेशानंतरचे कोणतेही हस्तांतरण किंवा विभागणी, ही सुद्धा महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम१९६१ चे कलम २९ व त्याची नियमावली १९७५ मधील नियम १२ (ड-१) व त्याखालील उपकलमाचे उपबंधाचे अधिन असेल.

७) वरील पैकी कोणत्याही अटीचा भंग झालेस अगर प्रस्तावातील माहिती खोटी असल्याचे नंतर आढळून आल्यास या  आदेशान्वये दिलेली परवानगी कोणतीही नुकसान भरपाई न देता रद्द समजण्यात येईल व सदरची जमीन कायद्यांतर्गत तरतुदीनुसार सरकार जमा करण्यात येईल.

अशाप्रकारे सदर जमीन खरेदी घेणार श्री. राजकुमार संदीपान जाधव यांना १ ते ७ अटी व शर्ती घालून सदर सिलिंग जमीन खरेदीची परवानगी देण्यात आली होती.परंतु श्री राजकुमार संदिपान जाधव यांनी

 तात्कालीन गाव कामगार तलाठी पुरुषोत्तम पुजारी सांगोला व तात्कालीन मंडळअधिकारी श्री. नवले सांगोला, यांच्याशी संगणमत करून, सदर खरेदी केलेल्या सिलिंग जमिनीची ७/१२ पत्रकी अंमल घेतलेल्या फेरफार नंबर  ३६२८९ मध्ये अधिकाराचा गैरवापर करून तात्कालिन गाव कामगार तलाठी 

पुरुषोत्तम पुजारी यांनी फेरफार मध्ये खाडाखोड  करून, जमीन स.नं.३७४/२अ  च्या हस्तलिखित ७/१२ उता-याच्या इतर हक्कात "तबदील व सहकारी संस्थे शिवाय गहाण देणेची नाही". हा शेरा बेकायदेशीर रित्या खाडाखोड,करून कंसकरुन कमी केला.

व फेरफार नंबर  ३६२८९ हा खरेदी नोंदी चा फेरफार असताना सदर फेरफार मध्ये खाडाखोड करून,"तसेच तबदील व सहकारी संस्थे शिवाय गहाण देणेची नाही"हे वाक्य फेरफार मध्ये बेकायदेशीररित्या वाढवलेले, 

सदर फेरफार तात्कालीन मंडळ अधिकारी यांनी बेकायदेशीर रित्या मंजूर केला मंजूर केला आहे.सदर सिलिंग जमीन खरेदी दस्त नंबर १६४७/२०१२ च्या पान ११ वर नमूद असलेल्या अटी व शर्ती मधील नं  ४ नुसार  ७/१२ उता-यावर  इतर हक्कात नोंद घेणे अपेक्षित होते 

परंतु तत्कालीन गाव कामगार तलाठी व मंडळ अधिकारी सांगोला यांनी श्री.राजकुमार संदीपान जाधव यांचेशी संगणमत करून, अटी व शर्ती मधील नं  ४ नुसार नोंद सातबारा उताऱ्यावर जाणीवपूर्वक घेतली नाही.व जमीन सर्वे नंबर  ३७४/२अ च्या ७/१२ उता-यावर  इतर हक्कात,

 "तबदील व सहकारी संस्थे शिवाय गहाण देणेची नाही ".असणारा शेराही, जाणीवपूर्वक आपल्या कार्यालयीन कर्तव्यात कसूर करून, तत्कालीन मंडळ अधिकारी व गाव कामगार तलाठी सांगोला यांनी कंस करुन कमी केला आहे. 

जमिनी खरेदी घेणार श्री.राजकुमार संदिपान जाधव यांना,सदर सिलिंग जमीन सर्वे नंबर ३७४ /२अ क्षेत्र २ हेक्टर १० आर हि जमीन खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कडून देण्यात आलेल्या, क्रमांक सिलिंग/ 

एसआर/६३/२०११ दि.०९/०४/२०१२ रोजीचे आदेशामध्ये घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तींची कल्पना/ माहिती असतानाही, जाणीवपूर्वक स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने घालून दिलेल्या,अटी व शर्तीचा भंग केला आहे. व शासनाची आणि नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक करून, स्वतःच्या 

आर्थिक फायद्यासाठी तत्कालीन गाव कामगार तलाठी व मंडळ अधिकारी सांगोला यांच्याशी संगणमत करून, शासनास मिळणाऱ्या लाखो रुपयाचे नुकसान करून,अनेक नागरिकांची फसवणूक करून , लाखो रुपयाचा आर्थिक फायदा करून घेतला आहे.

 त्यामुळे सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करून तत्कालीन गाव कामगार तलाठी पुरुषोत्तम पुजारी व मंडळ अधिकारी श्री. नवले सांगोला यांच्यावर,शासकीय दफ्तरात खाडाखोड कले बाबत. फौजदारी गुन्हा दाखल करून, जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कडून देण्यात आलेल्या, क्रमांक सिलिंग/ एसआर/६३/२०११ 

दि.०९/०४/२०१२ रोजीचे आदेशामध्ये घालून दिलेल्या अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे सदर जमीन  सरकार जमा करण्यात यावी, अशी मागणी श्री.उमेश मंडले सचिव जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य.यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments