google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्त्रीजन्माचे स्वागत : खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम कन्यारत्नाचा जन्म झाल्यास नॉर्मल डिलिव्हरीचे संपूर्ण हॉस्पिटल बिल माफ करण्यात येणार

Breaking News

स्त्रीजन्माचे स्वागत : खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम कन्यारत्नाचा जन्म झाल्यास नॉर्मल डिलिव्हरीचे संपूर्ण हॉस्पिटल बिल माफ करण्यात येणार

 


स्त्रीजन्माचे स्वागत : खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम


कन्यारत्नाचा जन्म झाल्यास नॉर्मल डिलिव्हरीचे संपूर्ण हॉस्पिटल बिल माफ करण्यात येणार

(शब्दरेखा एक्सप्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : समाजात स्त्रीजन्माचे महत्त्व अधोरेखित करत खंडागळे मल्टीस्पेशालिटी 

हॉस्पिटल, सांगोला येथे “स्त्रीजन्माचे स्वागत” हा नावीन्यपूर्ण आणि कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्यारत्नाचा जन्म झाल्यास नॉर्मल डिलिव्हरीचे संपूर्ण हॉस्पिटल बिल माफ करण्यात येणार आहे,

 तर सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास हॉस्पिटल बिलामध्ये विशेष सवलत देण्यात येईल. 

विशेष म्हणजे हा उपक्रम अमर्यादित काळासाठी सुरू राहणार असून कोणतीही कालमर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

आजही समाजात काही ठिकाणी स्त्रीजन्माकडे नकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतो. 

अशा परिस्थितीत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा हा उपक्रम स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यास 

तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक मानसिकता निर्माण करण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

हा उपक्रम सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक दिलासा देणारा असून समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारा आहे. 

परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध स्तरांतून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

स्थळ : खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कडलास रोड, सांगोला. मोबाईल - 7588506196, 8999611622

Post a Comment

0 Comments