google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात शिवसेनेतर्फे मतदार नोंदणी व नाव दुरुस्ती अभियान आशादेवी सोमेश यावलकर (नगरसेविका, सांगोला नगरपरिषद, सांगोला)

Breaking News

सांगोला शहरात शिवसेनेतर्फे मतदार नोंदणी व नाव दुरुस्ती अभियान आशादेवी सोमेश यावलकर (नगरसेविका, सांगोला नगरपरिषद, सांगोला)

सांगोला शहरात शिवसेनेतर्फे मतदार नोंदणी व नाव दुरुस्ती अभियान


आशादेवी सोमेश यावलकर (नगरसेविका, सांगोला नगरपरिषद, सांगोला)

(शब्दरेखा एक्सप्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : आपले नाव मतदार यादीत आहे का, याची खात्री करण्यासाठी तसेच नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी शिवसेनेतर्फे विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. 

या अभियानाअंतर्गत नवीन मतदार, स्थलांतरित मतदार तसेच नवविवाहितांसाठी मतदार यादीत नाव नोंदणी व आवश्यक दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नवीन मतदारांसाठी आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड / पॅन कार्ड, टी.सी. किंवा दहावीची सनद, लाईट बिल / गॅस कार्ड / रेशन कार्ड, एक फोटो तसेच आई-वडिलांच्या मतदान कार्डची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.

स्थलांतरित मतदारांसाठी आवश्यक कागदपत्रे :

नवीन निवासाचा पत्ता, आधार कार्ड / पॅन कार्ड, मतदार यादी भाग निश्चितीसाठी शेजाऱ्याच्या मतदार कार्डची झेरॉक्स प्रत, लाईट बिल / गॅस कार्ड / रेशन कार्ड व दोन फोटो आवश्यक आहेत.

नवविवाहितांसाठी आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड / पॅन कार्ड, टी.सी. किंवा दहावीची सनद, लाईट बिल / गॅस कार्ड / रेशन कार्ड, लग्नपत्रिका किंवा मॅरेज सर्टिफिकेट, पतीच्या इलेक्शन कार्डची झेरॉक्स प्रत, एक फोटो तसेच आई-वडिलांच्या मतदान कार्डची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.

हे अभियान वज्राबाद पेठ, सांगोला येथे दि. 16 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत चालणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले मतदार हक्क सुरक्षित करावेत, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

मो. 8390641064

आशादेवी सोमेश यावलकर

(नगरसेविका, सांगोला नगरपरिषद, सांगोला)

Post a Comment

0 Comments