अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे नागरिकांना आवाहन
(शब्दरेखा एक्सप्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत
असून या अधिवेशनात सांगोला विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या,
अपेक्षा व मुद्दे प्रभावीपणे मांडण्यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नागरिकांना थेट सहभागासाठी आवाहन केले आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, आतापर्यंत मतदारसंघातील स्थानिक प्रश्न,
विकासकामांशी संबंधित अडचणी, नागरिकांच्या अपेक्षा व सूचना हे ते नियमितपणे विधानसभेच्या सभागृहात मांडत आले आहेत.
मात्र याशिवाय सामान्य नागरिकांच्या मनातील प्रश्न, मुद्दे व सूचना थेट सभागृहात मांडता याव्यात, यासाठी नागरिकांचे मत अत्यंत महत्त्वाचे आहे.
यासाठी नागरिकांनी आपले प्रश्न, सूचना व मुद्दे ई-मेलद्वारे किंवा लेखी स्वरूपात कार्यालयात पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्राप्त झालेल्या मुद्द्यांना सभागृहात मांडण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नागरिक आपले मुद्दे पुढील ई-मेलवर पाठवू शकतात :
Email : office.drbabasahebdeshmukh@gmail.com
तसेच लेखी स्वरूपात आमदारांच्या कार्यालयातही निवेदने देता येणार आहेत.
या उपक्रमामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या प्रश्नांना
विधानसभेत थेट वाचा फोडण्याची संधी मिळणार असून लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग अधिक मजबूत होणार आहे.
—
डॉ. बाबासाहेब देशमुख
आमदार, सांगोला विधानसभा


0 Comments