google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील सर्व तलाठी कार्यालय होणार बंद देवेंद्र फडणवीस यांचा आदेश जारी

Breaking News

राज्यातील सर्व तलाठी कार्यालय होणार बंद देवेंद्र फडणवीस यांचा आदेश जारी

राज्यातील सर्व तलाठी कार्यालय होणार बंद देवेंद्र फडणवीस यांचा आदेश जारी


(शब्दरेखा एक्सप्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

शेती आणि जमिनी संदर्भात कोणतेही काम असेल तर तलाठी कार्यालयात जावं लागतं.तसेच कार्यालयात जाऊनही कामे वेळेत होत नाहीत .असे अनेक लोक तक्रार करत असतात मात्र आता 

याच सर्व त्रासातून मुक्तता मिळणार आहे .जिल्ह्यातील 11 प्रकारच्या फेरफार नोंदीसाठी आता  ई-हक्क प्रणाली तलाठी कार्यालयात हेलपाटे बंद ,घरबसल्या करा 11 कामे शेती आणि जमिनी संदर्भात, कोणतेही काम असेल तर तलाठी कार्यालयात जावं लागतं 

तसेच कार्यालयात जाऊन ही कामे वेळेत होत नाहीत. आशा अनेक लोक तक्रार करत असतात .मात्र आता या सर्व त्रासातून मुक्तता मिळणार आहे. जिल्ह्यात 11 प्रकारच्या फेरफार नोंदीसाठी आता ई -हक्क प्रणाली 

च्या माध्यमातून अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे .वारस नोंद, मृत व्यक्तीचे नाव कमी करणे, बोजा चढवणे, किंवा गहाणखत तयार करणे यासारख्या प्रक्रिया फक्त ऑनलाईन वरच पार पडणार आहेत .

ई-हक्क प्रणालीचा वापर केला जाणार

तलाठी कार्यालयात कोणतेही कामकाज असेल तर अनेक नागरिक अद्यापही ऑफलाइन अर्ज सादर करतात.अशा अर्जाची नोंद ऑनलाईन स्वरूपात करण्यात यावी ,आणि पुढील प्रक्रिया पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला दिले आहेत.

ई-हक्क प्रणाली द्वारे फेरफार नोंदीसाठी नागरिकांना 11 प्रकारचे अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे.तथापि,ग्रामीण भागात ऑनलाईन अर्ज प्रक्रिये बाबत माहिती अभाव असल्यामुळे अनेक जण तलाठ्याकडे प्रत्यक्ष अर्ज देतात.

यामुळे अर्ज प्रक्रिया विलंबित होते.आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑनलाईन नोंदी अभावी संबंधितावर कारवाई करणे कठीण होते.जिल्ह्यात अद्यापही ई-हक्क प्रणालीचे 100% अंमलबजावणी झालेली नसली तरी ती प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत .

स्वतंत्र कर्मचारी नियुक्तीचा आदेश

महसूल विभागाकडून ई-हक्क प्रणालीच्या अर्जाचे मंजुरी प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधिकारी यांनी स्वतंत्र परिपत्रक जारी करून तालुकास्तरावर तलाठी,प्रांत अधिकारी यांना या प्रणालीच्या अभावा अंमलबजावणीसाठी निर्देश दिले आहेत.

जर अर्जदार ऑनलाइन अर्ज करण्यास सक्षम नसेल तर तलाठी मंडलाधिकारी तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असे आदेश देण्यात आले होते 

*ई- हक्क प्रणाली द्वारे कोणती कामे करता येणार*!

१) ही करार नोंदणी

२) बोजा चढवणे गहाणखत तयार करणे

३) बोजा कमी करणे

४) वारसा नोंदणी

५) मृत व्यक्तीचे नाव कमी करणे

६) अज्ञान पालन करता शहरा कमी करणे

७) एकत्र कुटुंब व्यवस्थापक नोंदणी कमी करणे

८) विश्वस्ताची नावे बदलणे

९) खातेदाराची माहिती भरणे

१०) हस्तलिखित व संगणकृत तफावत संदर्भात अर्ज

११) मयत कुटुंबातील वारसा नोंदणी

कोल्हापूर अँटी करप्शनच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; अपघातात दोघांचा जागीच  मृत्यू, वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर कोल्हापूर : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो मध्ये कार्यरत

 असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारचा आज पहाटे भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जण जखमी झाले आहेत.

 वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. बेंगळुरूहून कोल्हापूरकडे परतत असताना चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ हा अपघात घडला.

 वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या, ती कार अचानक एका लॉरीला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 अपघातानंतर जखमींना तातडीने चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले. अपघाताचे नेमके का...

  सांगोला पोलिसांकडून अट्टल मोटरसायकल चोरट्यास अटक; ०८ मोटार सायकली जप्त सांगोला:- मोटार सायकल चोरी करणारा गुन्हेगार जेरबंद करून बुलेटसह ०८ मोटार सायकली जप्त करुन ६,२०,०००/- मुददेमाल हस्तगत करण्यात सांगोला पोलिसांना यश मिळाले

 असल्याची माहिती  पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. सांगोला पोलीस ठाणे हददीत सांगोला शहर व ग्रामीण भागात मोटार सायकली चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या होत्या 

या घटनाना प्रतिबंध करणे व घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलीसांना निर्देश दिले होते या अनुशगाने सांगोला पोलीस ठाणे गु.र.नं. २४५/२०२५ बी एन एस कलम ३०३(२) प्रमाणे दाखल

 गुन्हयाचा तपास करीता असताना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, सांगोला शहरात जत तालुक्यातुन आरोपीत मजकुर येवून सदरच्या मोटार सायकल चोरी करतात अशी माहिती मिळाल्याने सदर

 आरोपीचा शोध घेणेकामी एक पथक नेमुन सदरचे पथक जत तालुक्यात सुमारे दोन दिवस पाळत ठेवून आरोपीत मजकुर यांचा शोध घेतला असता त्यांना आरोपी नामे गोविंद उर्फ पवन राजु काळे रा. लक्ष्मीनगर, उमराणी तांडा, जत, ता. जत...

  सांगोला तालुक्यातून ९ जणांना सांगोला पोलिसांनी केले हद्दपार सांगोला (प्रतिनिधी):- शुभम ऐवळे   दिनांक २७ ऑगस्ट ते  दिनांक ६ सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद चालु आहे. 

 त्याअनुषंगाने बी.आर. माळी (उपविभागीय दंडाधिकारी, मंगळवेढा) यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(२) अन्वये सांगोला तालुक्यातून ९ जणांना हद्दपार केले आहे. 

  हर्षद दाजी बनसोडे , सोमनाथ शिवाजी बनसोडे , विद्याधर दयानंद बनसोडे, अनिकेत बाबासो ढावरे , सचिन सुरेश प्रक्षाळे, अजित बाळु खांडेकर , ज्ञानेश्वर चंद्रकांत खांडेकर , शरद आनंदा लवटे, संतोष अंबाजी खांडेकर यांना सांगोला तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई आदेश जारी केला आहेत. 

 सांगोला शहर व तालुक्यामध्ये दहशत निर्माण करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची दाट शक्यता असल्याने व सार्वजनिक शांतता भंग करण्यास कारणीभुत होण्याची दाठ शक्यता वाटत

 असल्याने ९ जणांना तालुक्यातून हद्दपार करण्यात आले, असल्याचे सांगोला पोलिसानी सांगितले.   सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण अतुल कुलकर्णी , ...

Post a Comment

0 Comments