Breaking News

नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांच्या हस्ते प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना केले धनादेशाचे वितरण

नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांच्या हस्ते प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना केले धनादेशाचे वितरण




(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

आज दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी

 योजनेअंतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते कर्ज वितरण तसेच क्रेडिट कार्डचे उद्घाटन सोहळा तिरुवनंतपुरम,केरळ या ठिकाणी संपन्न झाला.

 या पार्श्वभूमीवर नगरपरिषद सांगोला येथे मा. नगराध्यक्ष श्री आनंद माने व मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या हस्ते 30 एवढ्या पथ विक्रेत्यांना पीएम स्वनिधी अंतर्गत कर्जाचे वितरण करण्यात आले.. 

 यावेळी सन्माननीय पदाधिकारी,कर्मचारी व लाभार्थी यांनी माननीय पंतप्रधानांच्या कार्यक्रमात आभासी (Virtual) पद्धतीने सहभाग नोंदविला. तसेच शहरातील पथविक्रेत्यांना कर्ज मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले. 

याप्रसंगी नगराध्यक्ष आनंद माने यांनी उपस्थित पथ विक्रेत्यांना मिळालेले कर्ज वेळेत परतफेड करण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच ज्या पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा (PMSVANidhi) अद्याप लाभ घेतला नसेल

 अशा पथ विक्रेत्यांना या योजनेची माहिती देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक श्री. नागेश गुंजोटे, युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्ज व्यस्थापक श्री. प्रवीण खटकाळे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments