google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चोपडी जिल्हा परिषद गटाचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्याहस्ते चोपडी -यादवमळा येथे आयोजित केलेल्या हापपीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

Breaking News

चोपडी जिल्हा परिषद गटाचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्याहस्ते चोपडी -यादवमळा येथे आयोजित केलेल्या हापपीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

चोपडी जिल्हा परिषद गटाचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत


यांच्याहस्ते चोपडी -यादवमळा येथे आयोजित केलेल्या हापपीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

स्व. भारत आनंदा यादव यांच्या स्मरणार्थ जाणीव ग्रुपच्या वतीने चोपडी- 

यादवमळा येथे हापपीच क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ उपसरपंच पोपटशेठ यादव यांच्यासह जाणीव ग्रुप , मित्रपरिवार‌ व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती 

सांगोला /प्रतिनिधी: सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील भाजप -शिवसेना युतीचे 

चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा चोपडी जिल्हा परिषद गटात गावभेट दौरा सुरू आहे.

 सोमेवाडी तालुका सांगोला येथे गावभेट दौऱ्यावर आले असता त्यांनी चोपडी - यादवमळा येथील स्व. भारत आनंदा यादव 

यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या हाप पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्या 

शुभहस्ते व चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव, भाजपचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, चेअरमन दगडू बाबर,यांच्यासह जाणीव ग्रुप व 

पोपटशेठ यादव मित्रपरिवाराचे सर्व सदस्य, मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते ,युवावर्ग व क्रिकेट खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

             यावेळी  क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी जाणीव ग्रुपचे सर्वेसर्वा राजूशेठ यादव, शंकर यादव, विकास गिड्डे, बंडू मेखले, 

संतोष यादव, जयदीप यादव, बाळासाहेब बाबर, वैभव पाटील, विशाल यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

चोपडी येथील जाणीव ग्रुपच्या वतीने स्व. भारत आनंदा यादव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भव्य हापपीच क्रिकेट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

स्व. भारत आनंदा यादव हे चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव यांचे बंधू होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या क्रीडा स्पर्धेला ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्व. भारत आनंदा यादव यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या सामाजिक जिव्हाळ्याच्या स्वभावाची व कार्याची आठवण 

करून दिली. यावेळी चोपडी गावातील क्रीडाप्रेमी, नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोणविरे, राजुरी, निजामपूर, मानेगावात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद

नगरसेविका सुजाताताई केदार सावंत यांनी साधला संवाद, हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद


सांगोला (प्रतिनिधी): चोपडी जिल्हा परिषद गटाचे भाजप–शिवसेना–आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार


 चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रचारार्थ लोणविरे, राजुरी, निजामपूर, मानेगावात आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या हळदीकुंकू कार्यक्रमाने महिलांच्या आशा, 

वेदना आणि स्वप्नांना व्यासपीठ मिळवून दिले. या कार्यक्रमाला महिलांचा भावनिक व उस्फूर्त प्रतिसाद लाभला. 

महिलांच्या प्रचंड उपस्थितीमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.

       चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत 

यांच्या प्रचारार्थ लोणविरे, राजुरी, निजामपूर, मानेगावात हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमात घर, संसार, शेती, मजुरी, बचतगट अशा जबाबदाऱ्यांचा भार पेलत

 स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्या महिलांनी या कार्यक्रमात आपले मन मोकळे केले. पाणी, रस्ते, आरोग्य, घरकुल यासोबतच 

स्वाभिमानाने जगण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक स्वावलंबन हा महिलांचा कळीचा मुद्दा ठरला.

       महिलांशी संवाद साधताना सांगोला नगरपालिकेच्या नगरसेविका सौ.सुजाताताई चेतनसिंह केदार सावंत म्हणाल्या की, “महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते, 

आणि कुटुंब सक्षम झाले तर समाज उभा राहतो. महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, 

महिलांनी उद्योगात पुढे यावे, त्यांचे कष्ट व कौशल्याला योग्य किंमत मिळावी, यासाठी मी कटिबद्ध आहे.” महिला बचतगटांच्या 

माध्यमातून उत्पादित वस्तूंना विक्रीसाठी स्थायी बाजारपेठ, प्रदर्शन, सरकारी खरेदीत प्राधान्य, प्रशिक्षण व भांडवल उपलब्ध करून

 देण्याचे ठोस प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या महिला स्वयंरोजगार, मुद्रा योजना, 

बचतगट योजना, प्रधानमंत्री आवास, आरोग्य योजना व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ शेवटच्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

        महायुतीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा 

निर्धार त्यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्य सरकारच्या महिला बचतगट, स्वयंरोजगार, मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आरोग्य व सामाजिक सुरक्षा 

योजनांचा लाभ प्रत्येक पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, 

चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांची विजयी घोडदौड अधिक वेगाने सुरू असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Post a Comment

0 Comments